Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० मे, २०२४

*"हुकुमशहा"च्या अस्ताची सुरुवात -----400 पार चा फुगा फुटणार* *इक्बाल मुल्ला ,-सांगली*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत "भाजपचा" "फुगा" फुटला असून महाराष्ट्रासह संपूर्ण "भारतात "भाजपाचे ,पानिपत होण्याचे संकेत मिळत आहेत .आज भाजपा /मोदीलाट ओसरली असून,जनतेला विनाश नको तर विकास हवा आहे हे विद्यमान लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्पष्ट झाले आहे . 

 वास्तविक, भाजपने पुढील 5-10 वर्षात भारताला जागतिक पातळीवर किती "उच्च स्थानापर्यंत " घेऊन जाणार ,भारताची नेत्रदीपक "प्रगती" करणार हा "अजेंडा असायला हवा होता.धर्माचा आधार घेत ,हिंदू -मुस्लिम करत , देश जिंकता येत नसतो , देशवासीयांचे आशीर्वाद आणी मत हे दोन्ही जिंकण्यासाठी त्यासाठी भारताच्या उन्नतीचे - विकासाचे व्हिजन असायला हवे हे भाजपा विसरली आहे . त्यामुळेच 2024 मध्ये महायुतीला महाराष्ट्रात 10 ते 12 जागा आणि भारतात देशपातळीवर किमान 150 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे .    

     : जनतेला विनाश नको विकास हवा !



भारताच्या पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात काय केले ??? आत्तापर्यंत जे केले ते फक्त ट्रेलर होते असे ते म्हणतात .आत्तापर्यंत यांनी काय केले ?? गेल्या 10 वर्षात डॉ .बाबासाहेब आंबडेकर यांच्या आदर्शवत असणाऱ्या संविधान ची त्यांनी "वाट" लावली नाही का ? जेथे जेथे भाजपा सरकार आहे तेथे - तेथे भारताच्या विश्वविद्यालयातील आदिवासी ,आणि इतर जातींच्या लोकांचा "अधिकार" मारला गेला नाही का ?? ,, युवकाच्या डोक्यावर भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी लघुशंका केली. भाजपचे हेच "मिशन" आहे का ??

 ♦️ 3000 महिलांशी लेंगिक शोषण*! कर्नाटकातील* त्यांच्या प्रजवल रेवण्णा आणि सहकाऱ्यांनी 3000 महिलांवर लैंगिक अत्याचार केले . याच उमेदवाराचा प्रचार आपले आदरणीय "पंतप्रधान" करतात .गुजरात मध्ये "बिल्किसबानो" प्रकरणात अडकलेल्या अपराध्यांना भाजप स्वागत करते . त्यांचा सन्मान करते . संपूर्ण देशात दलित आणि इतर जमातींच्या लोकांवर अत्याचार केले गेले .मणिपूर मुळे माणुसकीची सीमा संपुष्ठात आली ."महिलांना नग्न" करून फिरवण्यात आले. जगात भारताची मान खाली गेली. परंतु आपले आदरणीय पंतप्रधान शांत होते .  



ईडी आणि खासदार फोडी !


ईव्हीएम (EVM) आणि ईडी यांचे "साटेलोटे" आहे का ?? असाच प्रश्न जनतेला पडला आहे .कारण 60% जनता भाजपाला , महागाईला कंटाळली आहे ,भारतात मोदी विरोध* सुरु आहे तरीही भाजपचं सत्तेवर कसे येते ?? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावत आहे . आज भारताच्या सर्व राज्यात 'खासदारांची' तोडफोड करत भाजपाची सरकारं बनवण्यात आली नाहीत का ?? ही लोकशाहीची हत्या नाही का ??? "ईडी"ची भीती घालून आमदार - खासदार फोडण्यात आले आणि सत्ता उपभोगण्यात आली. 

    पुतीन आणि किंग जोम हे हुकूमशहा !


 * अमित शाह म्हणतात भविष्यात आम्ही 50 वर्ष राज्य करणार .म्हणजे लोकशाही ची "हत्या" करत रशियाच्या पुतीन आणि उत्तर कोरियाच्या "किंग जोंग उन प्रमाणे "हुकूमशाही" करणार का ??

भाजपचे नेते सर्वासमक्ष "डॉ . बाबासाहेब आंबेडकर" यांचे संविधान "बदलण्याची" धमकी देतात. जातिव्यवस्थेची चिरफाड करत 50 वर्ष सत्ता गाजवणार का ??? 

        नोटबंदी बोगस, काळापैसा एक थोतांड* ! 


भारतातील जनतेमध्ये आज नोटबंदी मध्ये संपूर्ण भारताला पंतप्रधानांनी ,रांगेत उभे करण्यास भाग पाडले.परंतु सिद्ध काहीच झाले नाही . काळापैसाछृ सापडला नाही . परंतु शेकडो लोकांनी आपला *प्राण सोडला . हे सरकारचे "अपयश" नाही का .??

 कोरोना " काळात लाखो लोक आपले प्राण त्यागत असताना आपले पंतप्रधान 'टाळी' वाजवत होते .व जनतेला थाळी वाजवण्याचे व घंटा वाजवण्याचे आवाहन करत होते . 

मध्यंतरी देशात मोठी बेरोजगारी आली होती .त्यावेळी अग्निविर च्या माध्यमातून 2 करोड लोकांना "रोजगार" देण्याचे "खोटे आश्वासन" देण्यात आले . आणि "फसवणुक" करण्यात आली .  

भारताच्या कुस्ती क्षेत्रातील महिलांनी न्याय मागितला .परंतु त्यांना न्याय मिळाला नाही . पंतप्रधान शांत राहिले . महिलाकुस्तीपटूंनी दीड महिने रस्त्यावर आंदोलन केले .पण ते आंदोलन चिरडले गेले . पंजाब मध्ये शेतकऱ्यांनी योग्य भाव मागितला तेंव्हा त्यांचे ही आंदोलन चिरडण्यात आले.आणि त्यांना "काठ्या" खाव्या लागल्या .पंजाबच्या तब्बल 750 शेतकऱ्यांचे बळी गेले पण आपल्या पंतप्रधानांनी मध्यस्ती केली नाही ही "हुकूमशाही" नव्हे का ??? 

  जीवनावश्यक वस्तू महाग

 !

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत .गॅस 800-1000 रुपये झाला आहे ,पेट्रोल 112 रुपये झाले आहे , सी .एन .जी 92 रुपये झाले आहे , भाज्या , तेल , कडधान्य , सर्व "महाग" झाले आहे .आणि अजूनही यांना "सत्ता" हवी आहे .


      सरकारी यंत्रणाचे खाजगी लोकांना कंत्राट


भारताच्या सर्व सरकार सेवा, बँक एल आय . सी . कोळसा , वीज , आपल्या मित्रांना देण्याचे "पाप" केले गेले "अदानी - अंबानी "यांना सरकारी कार्यालये विकली जात आहेत ., रेल्वे चे "अर्धे" खाजगीकरण झाल्यातच जमा आहे 

 .सरकारी "विमान कंपन्या" विकल्या गेल्या आहेत , आपल्या मित्रांचं 15 लाख करोडचे कर्ज माफ केले .निरव मोदी,चोक्सी यांचे 20000 करोड ,विजय माल्य्या 10000 करोड , नितीन संदेसरा 6000 करोड ,ललित मोदी 3000 करोड घेऊन परदेशात पळाले . अजूनही यांच्यावर कारवाई नाही. यांच्यामुळे देश अडचणीत आला आहे . आणि आज यांच्यामुळे भारतावर "200 लाख चे कर्ज" झाले आहे .आज रुपयाची किंमत कमी होत चालली आहे . "हिंदू खतरे में" .. असे भासवले जाते परंतु प्रत्यक्ष भारतातील-- 17 हजार हिंदूंनी-- भारत सोडला आहे. पंतप्रधानांकडे याचे उत्तर आहे का ???

प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात भारत आज 142 व्या नंबर वर आहे .भारतातील 5% लोकांकडे 60 लोकांच्या इतकी संपत्ती आहे .आणि 82 करोड लोक "रेशन" घेण्यासाठी रांगेत उभे आहेत .ही आजची परिस्थिती आहे .

भारतातील शेतकरी कर्जमाफी मागत आहे. ते देण्यास तयार नाही परंतु आपल्या मित्रांचे 200 करोड कर्ज माफ केले जातात.. हा न्याय आहे का ??

भारतीय सीमेमध्ये चीनची घुसखोरी चालू आहे , पठाणकोट हल्ला ,पुलवामा येथे भारतीय सैनिक बळी पडले .याला जबाबदार कोण ??? भारतीय हद्दीत इतक्या मोठ्या प्रमाणात RDX (आर .डी .एक्स.) कुठून आले ??? याचे उत्तर मिळेल का ?


      400 जागांचा फुगा फुटला आहे


पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आल्यास भाजपा संविधान नष्ट करेल ,आदिवासी ,दलित आणि सर्वांचे आरक्षण रद्द होईल , अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे . आज भाजपाचे खरे "मिशन" सर्वांना कळाले आहे .जनता शहाणी झाली आहे. त्यामुळेच 400 चा फुगा फुटणार आहे आणि ही "हुकूमशहा" च्या अस्ताची सुरवात आहे .



*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा