*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
संग्रामनगर- अकलूज येथील हजरत पठाण बाबा उरुस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून हा कार्यक्रम हजरत पठाण बाबा उरुस कमिटी ,अल् फतहा मशिद जमात, व सहारा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करुन साजरा करण्यात आला होता.
प्रारंभी शौकत भाई यांनी नात पठण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अल् फतहा मशीदच इमाम हाफीज व कारी मोहम्मद रफीक साहब यांनी उपदेश पर प्रवचन केले तसेच अल फतहा मशिदीत कुरान पठण शिकून ते पूर्ण कुराण पठण केल्याने पाच जणांना ( सनद) प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आणि यंदा 2024 मध्ये पविञ हज याञेस जाणाऱ्या दोन भगिणींचा सन्मान ही करण्यात आला
याप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले संग्रामनगरचे सरपंच पंकज गाडे ,मौलाना अब्दुल वाहिद , जामा मशिद अकलुज चे मौलाना मोहम्मद आली रजवी कुरेशी मशिद चे मौलाना मुफ्ती अदिल रजा पत्रकार हुसेन मुलाणी, मोहसीन शेख बादशाहा शेख ,यांचा सत्कार सर्वश्री शौकतभाई तांबोळी, मुसाभाई तांबोळी , हमीद मुलाणी, अकबर तांबोळी, अजीम तांबोळी, यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हजरत पठाण बाबा उरुस कमिटी ,अल फतहा मशीद जमात, तसेच सहारा बहुउदूदेशिय संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या उरुस निमित्त महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला शेवटी सलातो सलाम नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा