Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ मे, २०२४

*महाळुंग श्रीपुर नगर पंचायतचे निष्क्रिय कारभाराने नागरिक त्रस्त तर नगरसेवक निद्रिस्त*

 


*श्रीपूर --- बी.टी शिवशरण.

ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत आली आता सर्व वार्डातील विकास कामे होतील सुधारणा होतील गाव स्वच्छ सुंदर होईल या नागरिकांच्या अपेक्षा होत्या पण कशाचे काय नागरिकांना प्रस्तावणयाची वेळ आली आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून चार मुख्याधिकारी झाले आहेत त्यातील एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला नगरपंचायतला सक्षम व दूरदृष्टीचा व विकासाभिमुख प्रशासकीय मुख्याधिकारी मिळत नसल्याने नगरपंचायतचा कारभार सुस्त झाला आहे सर्वसामान्य नागरिकांना नगरपंचायत कडुन सहकार्य व योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत नगरपंचायत कडून दाखला माहिती व संबंधित तक्रारींचे निवारण बाबत नागरिक गेले तर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसतात मुख्याधिकारी केव्हा येतात कधी भेटतात या बाबत कोणी सांगत नाहीत मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत दाखला आठ दिवसांनी मिळेल असं सांगितलं जाते नागरिकांना योग्य वागणूक दिली जात नाही मोघम उत्तरे दिली जातात यांवर कळस म्हणजे पाणीपट्टी घरपट्टी व इतर थकबाकी भरणा केलेल्या पावत्या दिल्या जातात पण नगरपंचायतचे रेकॉर्ड ला नोंद नसल्याचे आढळून आले आहे सुशिक्षित नागरिकांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित कारकुन यांना भेटून थकबाकी भरल्याची पावती दाखवली तेव्हा सारवासारव करून चुक कबूल करून माफी मागण्याचे प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून घडले आहेत नगरपंचायत हद्दीत सर्वच ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत कोणी कसेही अतिक्रमण करुन रस्ते अडवले आहेत कोणी कुठेही आपली वहाने रस्त्यावर उभी करुन वहातुकीची कोंडी करुन रहदारीचा खेळ खंडोबा करत आहेत या अतिक्रमण केलेल्या रस्त्यावर नेहमी लहानमोठे अपघात होत आहेत अनेक जायबंदी झाले आहेत काहींनी प्राणास मुकावे लागले आहे या गंभीर प्रकाराकडे नगरपंचायत चे मुख्याधिकारी अधिकारी जराही लक्ष देत नाहीत मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरपंचायतचे वार्डातील विभागांना भेट देऊन समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी भेटी द्यायला पाहिजे पण ते कधी फिरकले नसल्याची चर्चा होत आहे निवडणुकीत ज्या नगरसेवक तसेच पार्टी प्रमुख यांनी आश्वासन दिले होते ते पुर्ण होत नाहीत नगरपंचायतला विकास निधी उपलब्ध करण्याची गरज आहे मात्र सत्ताधारी पार्टी व विरोधक व इतर आघाडी चे नगरसेवक यांच्यात काम व टेंडर वरुन प्रत्येक मिटिंगमध्ये वाद व तक्रारी होत असल्याचीच चर्चा ऐकायला मिळते गावाच्या विकासासाठी सर्वांनी एक होऊन सुधारणा करायला हवी विकासकामे करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे पण असे काही होत नाही त्यामुळे नगरपंचायत कडून विकास कामे रेंगाळली आहेत पावसाळा सुरू होत आहे सार्वजनिक गटारी नाले ओढे रुंदीकरण व साफसफाई होणं अपेक्षित आहे मात्र दरवर्षी पाऊस पडला की सर्व गटारीचे नाल्याचे पाणी रस्त्यावर व काही नागरिकांच्या घरात दारापर्यंत येते दर वर्षी पावसाळ्यात झोपडपट्टीतील रस्त्यावर चिखल व दलदल होते पण पावसाळ्या पुर्वी मुरुम टाकणे अपेक्षित असते पण टाकला जात नाही ऐन पावसाळ्यात नगरपंचायत कडे मुरुम टाकण्या साठी मागणी वाढते तसेच पावसाळ्यात मुरुम काढता येत नाही वहान नेता येत नाही ही गैरसोय नगरसेवकांना माहीत आहे त्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे पावसाळ्यात वारं सुटते रस्त्यावर झाडे त्यांच्या फांद्या विद्युत तारांना घर्षण करत असतात ती कामे इतर वेळी करत नाहीत ऐन पावसाळ्यात व मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्युत वितरण कर्मचारी करतात त्यामुळे ऐन कडक उन्हात विद्युत पुरवठा अनेक तास खंडित केला जातो उन्हाचा चटका व लाईटचा फटका याचा मोठा झटका नागरिकांना सोसावा लागतो मात्र सोयीनुसार सर्वजण वागतात नागरिकांची अडचण कोणी लक्षात घेत नाहीत नगरपंचायतचे मुख्याधिकारी व संबंधित जबाबदार अधिकारी हे कार्यालय कक्षेत रहात नाहीत त्यामुळे ते अडचणी वेळी फोन केला तर उचलत नाहीत नगरपंचायत कडे मोकाट जनावरे कुत्री पकडण्यासाठी यंत्रणा नाही अग्निशमन गाडी नाही डास निर्मुलन फवारणी यंत्रणा उपलब्ध नसते नगरपंचायतचे अडीच वर्षातील एकच काम बरे आहे ते म्हणजे दररोज घरोघर कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी येते गावाचा विकास व भले करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक विरोधी नगरसेवक एकत्र आले पाहिजेत पण तसे होत नाही पाच वर्षांचे नियोजन करणं जरूरीचे आहे मुख्याधिकारी यांनी सर्व वार्डातील विकासकांच्या प्रश्नांकडे लक्ष पाहिजे त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत कोणताही अधिकारी त्याच्या कामाने लक्षात रहातो जनतेला न्याय देणारा विकासकामांचा पाठपुरावा करुन समस्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असले पाहिजे निष्क्रिय अधिकारी जनतेच्या मुळांवर नसले पाहिजेत मुंबईचे तत्कालीन महापालिका आयुक्त गो रा खैरनार जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे पोलिस आयुक्त ज्युलियस रिबेरो रमाकांत झा ही नावे महाराष्ट्रात सर्व नागरिकांच्या कायम लक्षात रहातात कारण त्यांनी त्यांच्या कामाने दाखवून दिलेले आहे जनतेचा विचार करून लोकाभिमुख कामं केल्यामुळे ते अधिकारी लोकांच्या कौतुकास पात्र आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा