*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शुक्रवारी पुण्यात मराठा आरक्षणामुळे चर्चेत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. सगेसोयरेची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा करण्यात यावा. जर हा कायदा केला नाही तर सर्व जातींना सोबत घेऊन विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी जरांगेंनी केली. तसंच येत्या 4 तारखेपासून यासाठी आमरण उपोषण देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत थेट सक्रीय सहभाग घेतला नाही. कुणाला पाडायचंय त्याला पाडा, असे म्हणत मराठा समाजाला जरांगे यांनी आवाहन केले. मात्र, जरांगे यांच्या प्रभावाचा आणि मराठा आरक्षणाचा परिणाम परभणी, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघात दिसून आला.
बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी असं राजकीय समीकरण ऐन निवडणुकीत पाहायला मिळालं. या जातीय समीकरणाला अनेकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी जोडलं आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली असल्याने सर्वच पक्षांना आपली गणिते या पार्श्वभूमीवर पुन्हा मांडण्याची वेळ येऊ शकते असे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा