*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शंकरनगर-अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट संचलित सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद,बेंगलोर येथील त्रिसदस्यीय नॅक मुल्यांकन समितीने दि. २७ व २८ मे २०२४ रोजी भेट दिली.सदर समितीने महाविद्यालयातील सर्व सोई, सुविधांची तसेच कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद,बेंगलोर यांचेकडे पाठविला,त्यानंतर राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, बेंगलोर यांनी पिअर समितीच्या अहवालाचा अभ्यास करून महाविद्यालयास "ए" ग्रेड प्रदान केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी दिली.
या महाविद्यालयास प्रथम नॅक पिअर टिमने भेट दिली आहे व "ए" ग्रेड मिळविली आहे. त्याकरीता शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते- पाटील,ट्रस्टचे विश्वस्त व सचिव राजेंद्र चौगुले यांनी वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे महाविद्यालयास "ए" ग्रेड प्राप्त होण्यास मदत झाली आहे.
कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इंजिनीअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सचिन पांढरे यांनी नॅक समितीस आवश्यक असणारी आय.क्यू.ए.सी.समन्वयकाची महत्वाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.अतिशय कमी कालावधीमध्ये महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यालयीन अधीक्षक,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सांघिक प्रयत्नातून हे यश संपादन झाले. तसेच नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थी,पालक व सर्व स्टेक होल्डर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सकारात्मक अभिप्राय नोंदविल्याबद्दल प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये "ए" ग्रेड मिळाल्या बद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा