Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ जून, २०२४

*"शेलक्या बारा" सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-2024 ने सन्मानित*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448*

लेखक इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाची ' सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह-२०२४ ' साठी निवड झाली.तितिक्षा इंटरनॅशनल,पुणेच्या संस्थापक/अध्यक्षा प्रिया प्रमाेद दामले यांनी तसे अधिकृतरित्या पत्राद्वारे कळवले. हा पुरस्कार दि. ०९ जून २०२४,वार - रविवार राेजी लवकुश हाॅल,हाॅटेल अयाेध्या,कावळा नाका, काेल्हापूर या ठिकाणी लेखक इंद्रजित पाटील यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा कलासाहित्य व कविसंमेलनाचे उद्घाटक श्री.सुजित दातार ( साेल्युशन्स माईंड) ,प्रमुख पाहुणे मा.छाया सांगावकर ( अभिनेत्री, काेल्हापूर ) ,सन्मानीय उपस्थिती मा.स्वप्निल राजशेखर ( प्रसिद्ध अभिनेता ) , मा.सतीश इंदापूरकर ( नाट्य दिग्दर्शक ), विशेष मान्यवर मा.श्री.सतीश रणदिवे ( चित्रपट निर्माता दिग्दर्शक ), मा. श्री. संजय हळदीकर ( नाट्य दिग्दर्शक बालरंगभूमी ), मा. श्री. हिमांशू स्मार्त ( लेखक ), मा. श्री. युवराज पाटील ( लेखक ) , मा. शर्वरी जाेग ( अभिनेत्री ) आणि सर्व सारस्वतांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

    या कथासंग्रहास मिळालेल्या यावर्षीच्या या दुसऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल लेखक इंद्रजित पाटील यांचे मा.श्री.माधवरावजी कुतवळ,जनसेवक अमाेल ( भैया ) कुतवळ, तुळजापूर,लेखक सुनील विभूते,बार्शी,पंडितराव लाेहाेकरे,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा