*मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;-9730 867 448
सारोळा हिरवाईनी नटणार; वृक्ष लागवडीच्या शुभारंभ
सोरिजीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पुढाकार
*गावात ३५० पेक्षाही अधिक वृक्षाची लागवड करणार
ग्रामपंचायतच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम राबविणार
धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) हे गाव आता हिरव्यागार वृक्षांनी नटणार असून गावकऱ्यांच्या दारामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सोरिजीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ग्रामपंचायतच्या सहभागातून वृक्ष लागवड मोहिम हाती घेतले आहे. या वृक्ष लागवडीचा मान्यवरांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे केशर आंबा, नारळ यासह विविध जातींची ३५० पेक्षाही अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सारोळा गाव आता हिरव्यागार वृक्षांनी नटणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.
सारोळा हे ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे-पाटील यांचे गाव आहे. धाराशिव शहरापासून अवघ्या 11 किमी अंतरावर गाव वसलेले आहे. सध्या आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यरत असून विविध उपक्रम राबवत आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण अंगणातल्या तुळशीपासून परसातल्या पालेभाज्यापर्यंत, शेतातील अन्नधान्यापासून जंगलातल्या वनौषधीपर्यंत, गवताच्या तणांपासून ते वनातील महाकाय वृक्षापर्यंत या सगळ्याच वनस्पतींनी मानवी जीवनाला सधनता व संपन्नता प्राप्त करून दिलेली आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व लक्षात घेऊन सारोळा ग्रामपंचायतने सोरिजीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. कंपनीने गावात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करून दिली आहेत. गावांतर्गत रस्त्याच्या कडेला हे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या दारामध्ये केशर आंबा, नारळ या फळासह ऑक्सिजन देणारी विविध जातींची वृक्ष लावण्यात येणार आहेत. सोरिजीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ३५० पेक्षाही अधिक वृक्षाची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दारोदारी झाडे लावण्यात येणार असल्याने काही महिन्यांमध्येच गावातील रस्ते हिरव्यागार वृक्षांनी सजणार आहेत. या वृक्ष लागवडीचा शुक्रवारी (दि.७) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थाटात शुभारंभ करण्यात आला. गावातील श्री मारुती मंदिर, श्री गणेश मंदिरापासून या वृक्ष लागवडीचा 'श्री गणेशा' करण्यात आला. कार्यक्रमास कंपनीच्या वनिता गणेशन, मोहन कुमार, अमलन योती बहेरा, अरविंद कुमार, द्रुवसिंग कुमार, संतोष मुल्ला, कृष्णा जाधव, राजेश पिंडे गोविंद सिंग यांच्यासह गावच्या सरपंच निर्मलाताई चंदने, उपसरपंच वैभव पाटील, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य तुकाराम रणदिवे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत मसे, विनोद बाकले, नितीन चंदने, सावन देवगिरे, छत्रपती उदारे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल कठारे, दादा सुरवसे, श्री मुंडे सर, श्री बारटक्के, पडवळ, श्रीमती मगर, महावीर काकडे, भैय्या मसे, संजय पवार, राजेश मसे, ज्योतिराम रणदिवे, मारूती रणदिवे, विनोद शिंदे, बाळासाहेब परिट, भिमा गाडे, पप्पू कासार, सुरेश कठारे, ग्रामपंचायतचे लिपिक पांडुरंग रणदिवे, सेवक शैलेश शिंदे, दत्ता बगाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा