*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बुधवारी पुण्यातील एका भाविकाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला १५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत. गाभारा आणि अन्य कामासाठी बंद असलेले पंढरपुरातील विठ्ठल – रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी तब्बल अडीच महिन्यानंतर खुले झाले आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अशातच
हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी, येथील विठ्ठलभक्त बबन रामचंद्र तुपे यांनी विठ्ठलला चार पदरी व रुक्मिणी मातेला पाच पदरी असे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत. या हाराचे एकूण वजन २४९ ग्रॅम म्हणजेच १५ तोळे असून त्याची किंमत १५ लाख ९१ हजार ११० रुपये एवढी आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भाविक तुपे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याहस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा