Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ जून, २०२४

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 


*अकलूज ----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

 ६ जून २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.मराठा सेवा संघ व अकलूज नगरपरिषद यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे 

            ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन ३५० वर्षे पूर्ण होत आहे.त्यानिमीत्त रायगडावरती सर्व शिवप्रेमीच्या वतीने भव्य प्रमाणात सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे.त्याचाच एक भाग म्हणून मराठा सेवा संघ तालुका शाखा माळशिरस (अकलूज) व अकलूज नगरपरिषद यांचे वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कुटुंब मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या " स्वराज्याचे मानसशास्त्र" या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माईड ट्रेनर शिवश्री विठ्ठल कोतेकर कोल्हापूर यांची कुटुंब प्रबोधनाच्या व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले आहे.या व्याख्यानात कुटुंबातील सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची जडणघडण, संघटन,कौशल्य,युद्धनीती,राजनीती,टाईम मॅनेजमेंट,कुटुंब व्यवस्थापन व कौशल्य व्यवस्थापन अशा अनेक पैलूंचा आपल्या जीवनात उपयोग करून आजच्या धावत्या आणि स्पर्धेच्या युगात धाडसाने आणि कौशल्याने सर्वांगीण उन्नती कशी साधता येईल यावर सखोल प्रबोधन होणार आहे.अशा या कुटुंब मेळाव्यास सर्व शिवप्रेमी,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आजी-माजी

पदाधिकारी यांनी गुरुवार दि.६ जून रोजी सकाळी नऊ वाजता जय शंकर उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे व सकाळी साडे नऊ वाजता नगरपरिषदेच्या कार्यालयातील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील सभागृह अकलूज येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानासाठी सहकुटुंब हजर राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ तालुका शाखा माळशिरस व नगरपरिषद अकलूज यांचे वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा