Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ जून, २०२४

*शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति आणि दासबोध नको---- जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व सर्व बहुजनवादी संघटनेची मागणी*

 


*अकलूज ----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे.लोकसत्ता २४ मे मुंबई आवृत्तीमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोधाचा समावेश करू नये म्हणून माळशिरस तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड तसेच सर्व बहुजनवादी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने,रविंद्र पवार, अशोकराव रणवरे,अजित माने,राजेंद्र मिसाळ,शिवाजीराव लोंढे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अक्काताई माने,प्रिया नागणे,हेमा मुळीक, वनिता कोरटकर, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, शिवमती नंदाताई रणनवरे,शमा जगताप इत्यादी उपस्थित होते.

            माळशिरस तालुक्यातील 



ज्येष्ठ आंबेडकर चळवळीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, बहुजनवादी संघटनेचे नेते विकास धाईंजे, पंचायत सदस्य माजी सदस्य नेते अजय सकट, रविराज बनसोडे, मैत्री प्रतिष्ठानचे महेश शिंदे,डी.पी. आयचे महेंद्र साठे,सेवाभावी संस्था सचिन रणदिवे,सौरभ वाघमारे,रजनी साळवे,लहू धाईंजे,श्रीमंत बनकर,रहीम मुलाणी,सालगुडे पाटील व सर्व बहुजनवादी संघटनेची पदाधिकारी उपस्थित होते.



       यावेळी उत्तमराव माने, बाळासाहेब धाईंजे,विकास धाईंजे,अजय सकट,महेश शिंदे, सौरभ वाघमारे,श्रीमंत बनकर व प्रिया नागणे यांनी आपली मनोगत व्यक्त केले त्यात सर्वांनी शासनास पाठ्यपुस्तकात मनुस्मृती ग्रंथातील श्लोक व दासबोध मधील श्लोक घेण्यात येऊ नयेत जर का यात काही गडबड झाली तर माळशिरस तालुक्यात जिजाऊ ब्रिगेड सर्व बहुजनवादी संघटना,आरपीआय आंबेडकरवादी संघटना,मुस्लिम संघटना,महात्मा फुले समता परिषद,मैत्री प्रतिष्ठान,बहुजन मुक्ती पार्टी,दलित पॅंथर इत्यादींच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनास व शिक्षण मंत्री सर्व चळवलीतील नेत्यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,राज्यपाल,शिक्षण मंत्री,जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.सदर निवेदन नायब तहसीलदार कोळेकर साहेब यांनी स्विकारले व त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सर्व संघटनाच्या भावना शासनापर्यंत पोहोचू असे अभिवचन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा