*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज परिसरात अवैध धंदा्यांनी हैदोस घातला आहे. अकलूज शहर उद्वस्त होत आहे. अकलूज मध्ये जुगार क्लब मोठ्या प्रमाणात जोमाने चालू आहेत. हे असतानाच जुगार मधलाच भिंगरी हा दुसरा प्रकार आला आहे यामध्ये अनेक कुटुंब उधवस्त होत आहेत. व हे क्लब चालू असताना सर्व सामान्य लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जे लोक ही दुकाने चालवत आहेत त्यांना पोलीस प्रशासनाची कसलीही भीती नाही ते लोक पोलीस प्रशासनाला सुद्धा जुमानत नाहीत.त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आणि या लोकांचे काही संबंध आहे का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे
त्यामुळे या लोकांचे चालू असलेले हे धंदे तात्काळ बंद कारण्यात यावेत या मागणीचे महाराष्ट्र विकास युवा सेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा संघटक साईराज अडगळे, तालुका अध्यक्ष आदित्य काकडे, अकलूज शहर उपाध्यक्ष अजित माने, शहर संघटक चेतन साठे, सरचिटणीस अविनाश लोखंडे, सचिव सचिन लोखंडे,सुमित लोखंडे, विनायक रणदिवे, ज्ञानेश्वर लोखंडे, मोहित तांबवे इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा