*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
तुळजापूर येथील निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चोरीला गैल्या असुन त्याची चौकशी करुन संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करुन निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चालु करावी अशी मागणी शाम पवार व अमोल जाधव यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी केली.असुन या संदर्भात
मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना दिनांक 26/03/2024 रोजी निवेदन दिले होते मात्र अजब कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे ती पुढील प्रमाणे
वरील विषयास अनुसरुन आपनास निवेदन देण्यात येते की, 1948 साली निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला. या मराठवाड्यातील महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत निजाम राजवटीमध्ये तुळजापूर शहरात ऐतीहासीक 9 मुताऱ्या (एस. टी. स्टँड, आंबेडकर चौक, प्रताप टॉकीज, जवाहर गल्ली, भवानी रोड, शुक्रवार पेठ, आर्य चौक, साळुंके गल्ली, कमानवेस, पुर्व मंगळवार पेठ अशा ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या, परंतु गेली 10 ते 12 वर्षात त्या मुताऱ्या चोरीस गेल्या आहेत.
सदर विषयी संदर्भीय निवेदन . मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना दिलेले असुन सदर निवेदनावर मुख्याधिकारी न.प. तुळजापूर यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
तरी साहेबांनी याबाबत तात्काळ चौकशी करुन व अभिलेखाची पाहणी चौरी गेलेल्या निजाम काळातील एैतीहासीक नऊ मुतारी चालु करुन संबंधीतावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तरव तुळजापूर तालुका व शिवसेनेच्या वतीने अंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
शाम अंबादास पवार अमोल शिवाजी जाधव
मो.क्र. 9822777166
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा