*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संग्रामनगर येथे जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड बोलत होत्या.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी त्याकाळात शाहू महाराजांनी प्रयत्न केले.त्यांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देण्याचे कार्य केले तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.त्यानी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले.जात पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होते.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे संबोधले जाते.
या कार्यक्रमाला प्रदेश संघटक अक्काताई माने,सौ. अंजली दसूर,सरिता गोडावळे, प्रियंका घाडगे,संघटक आशा सावंत,तालुका प्रसिद्धी प्रमुख सुवर्णा घोरपडे,भाग्यश्री लोहकरे, सारिका गाडे,सुमन क्षिरसागर, शारदा गोडावळे,संघटक सुवर्णा क्षिरसागर,शहर कार्याध्यक्ष शारदा चव्हाण,संघटक कल्पना चव्हाण, विजया शिंदे,सुवर्णा शेंडगे,मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने, शिवाजीराव लोंढे,निलेश चव्हाण,नवनाथ नागणे,अजित वीर,बबनराव शेंडगे,प्रणव चव्हाण आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा