Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ जून, २०२४

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत कवी महिपती महाराज पालखी सोहळ्यासाठी लवंग ग्रामपंचाययीच्या वतीने नियोजन .

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

आज तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू येथून प्रस्थान झाले आहे.काही दिवसात माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग २५/४ येथे पालखीचे आगमन होत आहे.त्यानिमीत्त लवंग ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सोई उपलब्ध करण्यासाठी आज लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन झाले आहे.

           यामध्ये २५/४ व कदमवस्ती येथे पालखी स्वागत, पालखी मार्गावर आरोग्य विषयक सुविधा देणे.पालखी मार्ग स्वच्छता करणे.पालखी विसावा ठिकाणी स्वच्छता करणे.पालखी मार्गावरील व गावातील पाणी स्त्रोत शुद्धीकरण करणे.गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घेणे.पालखी विसावा ठिकाणी व पालखी मार्गावर लाईट सोय करणे.संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट पोलवरील बल्ब बसविणे.गावात डास प्रतिबंधासाठी धूर फवारणी करणे.पालखी विसावा ठिकाणी जंतूनाशक पावडर टाकणे, पालखी विसावा येथे मंडप सोय व दर्शन रांगांची सोय करणे.पालखी मार्गावर व पालखी विसावा येथे आवश्यक ठिकाणी मुरूम टाकणे,रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे झुडपे काढणे, सार्वजनिक शौचालय सोय करणे.संपूर्ण गावातील गटारी स्वच्छ करणे वारकऱ्यांसाठी वैयक्तिक शौचालय देणे, वारकऱ्यांसाठी स्नानगृह करणे. कचरा व्यवस्थापन करणे, प्लॅस्टिक संकलन करणे, वारकऱ्यांना बसण्यासाठी मंडप टाकणे,पालखी मार्गावर पालखी विसावा ठिकाणी शुद्ध पाणी सोय करणे.आरोग्य कक्ष उभारणे. हिरकणी कक्ष उभारणे.महिलांना सॅनेटरी नॅपकिन वाटप करणे व त्याचे डिसपोजल मशीन ठेवणे वारकऱ्यांसाठी फुट मसाज केंद्र उभारणे चप्पल दुरूस्ती स्टॉल उभारणे वारकऱ्यांसाठी झेंडूबाम व आयोडेक्स डब्बी वाटप करणे. वारकऱ्यांसाठी नाष्टाची सोय करणे.इतर आवश्यक सर्व कामे करण्यात आहेत.पालखी पुढे मार्गस्थ झाल्या नंतर पालखी विसावा ठिकाण पालखी मार्ग व गावातील स्वच्छता करणे. कचऱ्याचे व्यवस्थापन करणे.इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा