*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शेतात नांगरणी करू नको म्हणून नऊ जणांच्या जमावाने पाच जणांना कोयता काठी लागतात मारहाण करून तुम्ही परत बांधावर नांगरणीसाठी आला तर घरात घुसून मारीन अशी धमकी दिल्याने अकलूज पोलिसात अरिफा अब्दुल रहीम शेख राहणार संगम यांनी समक्ष हजर राहून अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे त्याबाबत अकलूज पोलिसात गुन्हा नोंद झाले वरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की
फिर्यादी जबाब दि. 30/06/202
अरिफा अब्दुलरहिम सय्यद वय-35 वर्षे व्यवसाय-शेती जात-मुस्लिम रा. संगम ता. माळसिरस जि. सोलापुर समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब देते की, मो. नं 9373417876
मी अरिफा वरील ठिकाणी माझे पती अब्दुलरहिम, मुलगा, तनवीर, आरबाज, सुरज असे एकत्रात राहणेस असुन आम्ही शेती करुन आमचे कुटुंबाची उपजिवीका भागवितो. माझी शेती साडे पाच एकर असुन आमचे शेताचे शेजारी रमेश काकडे व सतिश काकडे यांची दोन एकर जमिन असुन आमचे बांधकरी आहेत
दिनांक 30/06/2024 रोजी सकाळी 11/30 वा चे सुमारास नेहमी प्रमाणे मी व माझे मुले तनवीर, आरबाज, सुरज असे आमचे शेती गट नं 272/1/3/1/2/1 शेतात नांगरणेसाठी गेलो असता. आम्ही नांगरणेसाठी ट्रॅक्टर घेवुन नांगरणी करीत असताना आमचे जवळ अजित काकडे व आण्णा काकडे हे येवुन रमेश काकडे यांना फोन करून सांगत होते की नांगरणी करणेसाठी आरिफा सय्यद व त्यांची तीन मुले आलेले आहेत तुम्ही शेतात या असे सांगितले. थोड्या वेळाने सतिश काकडे हा आमचे जवळ आला व तो आम्हाला म्हणाला नांगरणी करु नका ट्रॅक्टर थांबवा मी तुम्हाला नांगरणी करुन देणार नाही. त्याचे पाठीमागे अनिल काकडे व ड्रायव्हर माने हा मागे पळत आला होता रमेश काकाडे हा त्याचे घराकडुन बाबा इनामदार, आप्पा ताटे, आबा गाडेकर, या लोकांना घेवुन शिवीगाळी करीत व आमचेवर दगड फेक करीत शेतात नांगरत असलेल्या ठीकाणी आले. त्यांनी दगडफेक करु लागल्याने आम्ही भिऊन नांगरणी करणे थांबविली. नंतर सतिश काकडे व रमेश काकडे हे दोघे त्याचे मुले अनिल काकड़े अजित काकडे, आण्णा काकडे, याना म्हणाले की जावा काठ्या, कोयती कु-हाड काय भेटेल ते घेवुन या असे म्हणालेवर त्या तिघांनी कोयता, लोखंडी पाईप व काठ्या घेवुन आले. त्यानंतर त्यांनी सर्वाच्या हातात काठ्या घेतल्या बाबा इनामदार याचे हातात लोखंडी पाईप होता व आण्णा काकडे याचे हातात कोयता होता. आबा गाडेकर यांनी तनविर यास ट्रॅक्टर वरुन खाली ओढले व सर्वानी काठ्यांनी मारणेस सुरुवात केली. त्यावेळी माझा मुलगा सुरज यास रमेश काकडे याने काठ्या व हाताने व लाथ्याबुल्याने मारहाण केली त्यावेळी माझा मुलगा आरबाज हा ट्रॅक्टर चालक सिटवर बसला होता त्यावेळी त्यास सतिश काकडे, अजित काकडे व अनिल काकडे यांनी काठ्यानी मारहाण केली व सतिश काकडे याने अरबाज याला ट्रॅक्टर वरुन खाली ओढले व मारहाण केली त्यावेळी बाबा इनामदार याने तु आमचे बांधावर यायचे नाही असे म्हणून दमदाटी करत होता त्यावेळी माझा मुलगा तनविर हा त्याचे माहाणीला विरोध करीत होता म्हणुन आण्णा काकडे याने त्याचे हातातील कोयता मुलगा तनविर याचे डाव्या हाताचे बोटावर मारला त्यावेळी त्याला जखम होवुन रक्त येवु लागले तसेच त्याचे डोक्यावर देखील जखम झाल्याने रक्त येत होते. त्यानंतर मी मारहाण करणा-या लोकांना मारहाण करु नका असे म्हणत असताना मला आबा गाडेकर यानें चापट मारली त्यामुळे मी खाली पडले त्यावेळी रमेश काकाडे व सतिश काकडे यानी लाथा मारल्या त्यावेळी माझे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसुत्र झटापटीमध्ये तुटले आहे व ते कोठे पडले मला माहिती नाही व मारहाण करणारे सर्व लोकांची मी मोबाईल मध्ये व्हीडीओ शुटींग करीत असताना माझा मोबाईल रमेश काकाडे याने माझा मोबाईल हातातुन घेवुन जमिनीवर आपटला. त्यानंतर मी माझे मुलाना मारहाण जास्त झाल्याने घेवुन जात असताना वरील लोकानी पुन्हा आमचे मागे शिवीगाळी करत येवुन काठीने हाताने व लाथ्थाबुक्याने मारहाण केली त्यावेळी वरील लोक हे आम्हांला तुम्ही बांधावर नांगरण्यासाठी आला तर घरात घुसून मारीन अशी धमकी दिली आहे. त्यांनतर आम्ही तेथुन मारहाण करण्या-या लोकांचे विरुध्द तक्रार देणासाठी पोलीस ठाणेस आलेलो आहे. पोलीस ठाणेस आल्यावर आम्हास दवाखाना यादी दिली त्यांनत आम्ही उपचार करुन वरील लोकांनविरुध्द तक्रार देणेस पोलीस ठाणेस आलो आहे. म्हणुन माझी मला व मारहाण करणा-या 1) रमेश काकडे 2) आण्णा काकडे 3) सतिश काकडे 4) अजित काकडे 5) अनिल काकडे 6) आबा इनामदार 7) आप्पा ताटे 8) आबा गाडेकर 9) माने ड्रायव्हर सर्व रा संगम यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता-1860 --कलम 324,323,427,504,506 ,143,147,148,149,व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951नुसार कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन पोलिस -कुंभार मो.9556 790 388 हे आधिक तपास करत आहेत
संगम ता माळशिरस जि सोलापुर त्यांचे विरुध्द माझी तक्रार आहे. माझा वरील संगणकावर टंकलिखीत केलेला जबाब मला माझा मुलगा विनोद याने वाचुन दाखविला तो आमचे सांगणे प्रमाणे बरोबर टंकलिखीत केला आहे.
समक्ष
हा जबाब दिला स.ता.म
(पोहेका 978 बकाल) पोलीस ठाणे अंमलदार अकलुज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा