Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० जून, २०२४

*पिलीव येथे -माळशिरस तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने *वृक्षारोपण" संपन्न*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

माळशिरस तालुक्यातील निमा संघटना व निमा वुमन्स फोरम तसेच होमिओपॅथीक संघटना व एम एच एफ डी ए,पिलीव मेडिकल असोसिएशन व पवार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिलीव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी पिलीवच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पशु व दुग्ध संवर्धन समितीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरीदार व पिलीव ग्रामपंचायतीचे सरपंच नितिन मोहिते उपस्थित होते.

         या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निमा वुमेन्स फोरमच्या सचिव डॉ.सौ.विद्या एकतपुरे यांनी केली.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळजी गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.तसेच निमा वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील अनेक विभागामध्ये वृक्षारोपण करून गावागावात वृक्षारोपणाची जनजागृती करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

            अध्यक्षीय भाषण संग्रामसिंह जहागीर यांनी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण मोहीम राबवून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे त्यांचे त्यांनी कौतुक केले. 



       या कार्यक्रमामध्ये डॉक्टर किड्स विशेष यश संपादन केल्याबद्दल भाळवणी येथील डॉ. नंदकुमार जगताप यांचा मुलगा अमेरिका येथे मास्टर इन फायनान्सचे शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने व त्यांची कन्या कु.धनश्री जगताप नीट मध्ये ६३५ मार्क्स मिळवल्याबद्दल विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.एम सी आय एम चे माजी सदस्य व मार्गदर्शक डॉ तानाजीराव कदम व निमा वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.डॉ.शुभागी माने देशमुख व डॉ.सुधीर पोफळे यांनी संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.



         या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.दादासाहेब पराडे-पाटील यांनी केले.डॉ.दिलीप पवार व डॉ.सौ. वंदना पवार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने करुन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल व सर्वांच्या स्वादिष्ट अल्पोपहराची सोय केल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा साठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टर उपस्थित होते.महिला डॉक्टर ही यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,निमा वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम व निमा टीम तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अभिजित राजेभोसले, होमिओपॅथी वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैष्णवी शेटे व होमिओपॅथी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन डॉ.पराडे-पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा