*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलुजसारख्या छोट्या शहरातील रुग्ण सतत जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानापासुन वंचीत होते.ग्रामीण जनतेला जागतिक दर्जाच्या सुविधा देणे हे वडिलांचे ध्येय व स्वप्न होते.त्या सामाजिक जाणीवेतुन अकलुजमध्ये जगातिल उच्च तंत्रज्ञानाने सज्ज अशा नेत्र रुग्णालय सुरु करुन ग्रामीण भागातच रुग्णांना अत्याधुनिक सेवा देण्यास सुरवात केल्याचे डॉ.निखिल गांधी यांनी सांगितले .
मराठी पत्रकार संघ माळशिरस तालुका आणि अनुपम आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर यांच्यां संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ.निखिल गांधी यांनी अकलुजसारख्या छोट्या शहरात डोळ्यांचे अत्याधुनिक हॉस्पिटल सुरु करण्या मागील इतिहास आणि उद्देश स्पष्ट केला.
यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ.राजीव गांधी अशुतोष देशपांडे, हाॅस्पिटलचे सर्व सेवकवर्ग, पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थितीत होते.
पुढे बोलताना डॉ.गांधी यांनी म्हणाले की,आपण परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतले.त्याठिकाणी आपणास आर्थिकदृष्या अतिशय पोषक वातावरण होते.मात्र आपण ज्या मातीत जन्मलो,वाढलो,शिकलो त्या ठिकाणीच आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे ही वडिलांची शिकवण होती.तसेच ग्रामिण भागातील रुग्णांना परदेशात अथवा मोठ्या शहरात उपचारापासुन वंचीत रहावे लागत होते.त्यामुळे आपण अकलुजमध्ये नेत्ररुग्णांना अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी अनुपम आय हाॅस्पिटलची नव्या पध्दतीने सुरवात केली.डोळ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणा-या उच्च तंत्रज्ञानाने संपन्न अशा अनेक मशीनचा हाॅस्पिटलमध्ये समावेश असल्याचे आवर्जुन सांगितले.
यावेळी कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन आणि आद्य पत्रकार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाळ लावंड यांनी केले.प्रस्ताविक रामचंद्र मगर यांनी केले.आभार सर्वजेष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे यांनी मानले.
*चौकट*
*मशिनसाठी आवडती कार विकली*
रुग्णांसाठी एका अत्याधुनिक मशिनची गरज होती.ती खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडले. त्यासाठी आपली आवडती लाल रंगाची जग्वार कार विकावी लागली.आपले स्वप्न असलेली जग्वार कार विकताना अंतकरण हेलावले मात्र रुग्ण सेवेपुढे मानावर दगड ठेवुन कार विकली पण मशिन आणली.हे सांगताना डॉ.निखिल गांधी यांची रुग्णांविषयीची तळमळ दिसत होती.तसेच रुग्णसेवेच्या माध्यमातुन आपणास जगातीला अनेक देशात जावे लागते मात्र आपल्या देशापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही.प्रत्येकाने आनंद हा आपल्यातच शोधला तर जीवन आनंदायी होईल असे भावनिक अवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा