*श्रीपूर----बी.टी.शिवशरण.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी देहू हुन जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर मार्गस्थ होत असतो ज्या गावात शहरात पालखी सोहळा येत असतो त्या दरम्यान रस्त्यावरील टपरीधारक लहान व्यापारी यांची दुकाने हटवली जातात विशेष म्हणजे त्या दरम्यान जी अतिक्रमणे तात्पुरती काढली जातात तेथे ज्या दिवशी पालखी सोहळा येत असतो त्या दिवशी खेळणी विक्रेते व इतर व्यावसायिक काढलेल्या जागेवरच त्यांची दुकाने थाटतात इथल्या टपरीधारक व व्यावसायिक यांनी असा आरोप केला आहे की पालखी सोहळा येत असतो म्हणून व वारकरी संप्रदाय यांना अडथळा व त्रास होऊ नये म्हणून प्रशासन स्थानिक लोकांचें अतिक्रमण काढून त्यांचेवर अन्याय करते मग काढलेल्या अतिक्रमण जागेवर खेळणी विक्रेते व इतर व्यावसायिक त्याच जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटतात त्यावेळी सोहळ्यास अडथळा येत नाही कोणता त्रास होत नाही तेव्हा स्थानिक गोरगरीबांच्या उदरनिर्वाह असणारी टपरी हातगाडे हटवू नयेत अशी मागणी होत आहे खेळणी विक्रेते व इतर व्यावसायिक यांना गावाबाहेर मोकळ्या जागेत त्यांची दुकाने थाटण्यास परवानगी द्यावी या बाबतचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा