इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-- माझ्या आरोग्य विभागातील २३ वर्षाच्या सेवेत पिंपरी बुद्रुक उपकेंद्रातील सहा वर्षांची सेवा सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्याने झालेली सेवा कायमची स्मरणात राहणारी असल्याचे भावोद्गार प्रदिप बोडरे यांनी सेवानिवृत्ती निमित्त सत्काराला उत्तर देताना काढले.
पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रदिप बोडरे यांच्या सेवानिवृत्त निमित्त ते बोलत होते. यावेळी डॉ सुमित्रा कोकाटे, प्रियंका पाटील, आशासेविका रफिया तांबोळी, पुष्पा ठोकळे, सुरेखा क्षिरसागर, सारीका वाघमारे, विद्या देशमुख, रूपाली चव्हाण, मालन जगताप, अश्विनी देवळे, स्वाती पाटील, आकाश शिंदे, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.
प्रदिप बोडरे यांच्या आरोग्य विभागातील २३ वर्षांच्या सेवा समाप्ती निमीत्त पिंपरी बुद्रुक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सौ. छाया व प्रदिप बोडरे यांचा सपत्नीक संपूर्ण कपड्याचा आहेर, स्टिल डब्यांचा शेट, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना प्रदिप बोडरे यांचा कंठ दाटून आल्याचे उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. काही क्षण दिरगंभीर व भावूक झाले होते. जरी मी सेवानिवृत्त झालो असलो तरी माझ्या अनुभवाचा फायदा करून देण्यात कमी पडणार नाही असा शब्द सत्कारा प्रसंगी बोलताना दिला.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने प्रदिप बोडरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा