Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ जून, २०२४

**राज्यात महायुती सरकार बरखास्त करून, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे "काँग्रेस" ची मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

महाराष्ट्रातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे अद्याप दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी,” अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.                             


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. आता निवडणुका संपल्यानंतरही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. त्यामुळे महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा