Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ जून, २०२४

*श्रीक्षेत्र तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाचे टॅपरूप ( टेन्सल फाॕर्बीक ) काम निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ बंद करा--धाराशिव जिल्हा उपप्रमुख -"शाम पवार "यांची मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

तुळजापूर ता. तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असुन ते त्वरीत बंद करावे शिवाय

दिनांक 20/12/2023 रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्याने तात्काळ काम बंद करुन नित्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धाराशिव जिल्हा शिवसेसेना ( उ बा ठा) उपजिल्हा प्रमुख शाम पवार यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रारी पुढील प्रमाणे वाचा                   



     श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन तेथे जे नविन बसस्थानक करण्यात येत असुन सदरील काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले माती मिक्स डस्ट वापरुन बांधकाम करीत असले बाबत आपणास निवेदन दिले होते. सदर निवेदनावर आपल्या मार्फत आज तागायत कोणतीही कार्यवाही झाले नाही तसेच वरील विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असुन त्या कामामध्ये लोखंड हलक्या प्रतीचे वापरण्यात येत आहे. व त्याकामध्ये खालील प्रमाणे त्रुटी आहेत. 



1. दोन्ही पाईपमधील वेल्डींग जॉईंट हे प्रॉपर नाहीत.

2. पाऊडशन बोल्ट प्रॉपर डिझाईन प्रमाणे नाहीत(पब्लीक प्लेस असल्याने ते हावेच्या, वारा वादळाच्या प्रेशरने ते केव्हाही पडु शकतात)

3. पाऊंडशन बोल्ट हे प्लेटच्या वरती नटबोल्ट नाहीत. प्लेटच्या बाहेर आर.सी.सी. कॉलम प्लेटच्या 80+80 पाहिजे. परंतु ते नसल्याने कॉलम तुटुन पडु शकतात. 

4. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जॉईंट होतो व 1 मीटर मध्ये 2 तुकडे जॉईंट स्ट्रक्चर अपरोल नाही.

5. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जोडताना सिलीव्ह जॉईंट असतात परंतु एवढया मोठया स्टक्चर मध्ये इतके छोटे छोटे तुकडे जोडले आहेत की त्यामध्ये एकही सिव्हील जॉईंट नाही व प्रॉपर जॉईंट नाहीत. 

6. दोन पाईपच्या मध्ये डिझाईन प्रमाणे असा जॉईंट असतो की त्याप्रमाणे जॉईंट दिसुन येत नाही. 


7. पाऊंडेशन डिझाईन प्रमाणे काम केले नसुन सदरील कामाचे वरील 1 ते 7 प्रमाणे मुळ डिझाईन प्रमाणे काम होत नसुन सदरील काम हे वाजवी दरापेक्षा जास्त असुन ते काम निकृष्ट दर्जाचे काम चालु असुन उत्कृष्ट दर्जाचे काम होत नाही त्यामुळे आपली व महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करुन थतर मतर काम करीत आहेत याबाबत आपल्या स्तरावर वरील संदर्भ व विषयास अनुसरुन चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही व संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा व श्री. क्षेत्र तुळजापुर येथील जुन्या बस स्टँडचे काम ईस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणा-या नवीन एजन्सी मार्फत काम करण्यात यावे. याबाबत आपण वरील संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी. जर भविष्यामध्ये या जुन्या बस स्टँड मध्ये पडझड किंवा जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी आपण स्वत: जबाबदार राहाल याची कृपया नोंद घ्यावी 

 तुळजापूर ता. तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) या कामाचे निकष दर्जाने होत असलेल्या कामाचे फोटो जोडले आहेत.



टीप ;- या न्यूज मधील व्हिडिओत पहा कामाचा निकृष्ट दर्जा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा