*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महर्षि संकुल यशवंतनगर येथे रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर पुण्यतिथीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला .यावेळी प्रमुख अतिथी सुधीर खरगे पोलीस उपनिरीक्षक अकलूज पोलीस स्टेशन, प्रशाला सभापती नितीनराव खराडे यांच्या शुभहस्ते आक्कासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी रत्नप्रभादेवी यांच्या ठायी असणाऱ्या ममत्व, दातृत्व व कर्तृत्वाची जाणीव करून दिली .प्राथमिक विभागाची विद्यार्थिनी श्रेया कदम हिने रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवन चरित्रावर शब्दांजली वाहिली.
संकुलातील गुणवंत विद्यार्थी साक्षी काळे ,गोडसे वैभवी, भोसले अनुजा, काटकर तेजश्री ,धाईंजे करण, सुजल घाडगे ,श्रावणी शिंदे, साक्षी मोहिते ,निर्जला लोखंडे यांचा पालकांसमवेत सत्कार समारंभ प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या सर्व देणगीदारांचा सन्मान समारंभ व्यासपीठावर पार पडला.
संकुलातील सहशिक्षिका सुषमा वाघमारे यांनी अनेक लहान मोठे प्रसंग रेखाटत रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतातून सायबर क्राईम ,डिजिटल अरेस्ट,सोशल मीडिया अवेअरनेस ,करिअर ओरिएंटेशन याबाबतीत जाणीव जागृती केली.
स्व ची शक्ती ओळखून आपल्या ठाई असणाऱ्या क्षमतांना वृद्धिंगत करत समाजाशी नाळ जोडण्याचा बहुमोल संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव ,नवनाथ पांढरे ,कैलास चौधरी ,देवडीकर मॅडम ,गायकवाड वहिनी, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, संकुलातील मुख्याध्यापक शिवाजी पारसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना रणनवरे यांनी केले तर आभार माऊली बनसोडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा