*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
वडगाव ( काटी )येथे शेत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण बाबत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते व शेतकरी महावीर माणिकराव काटकर यांनी राज्याचे राज्यपाल. रमेश भैस यांना निवेदन देऊन येथील मंदिरात उपोषणास बसले होते त्यांची तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे मागणी जाणून घेऊन तुळजापूरचे तहसीलदार यांना त्यांच्या अडीअडचणी संदर्भात त्यांना फोन लावून देण्यात आला व त्यांच्या अडीअडचणी तात्काळ सोडवण्याची विनंती तुळजापूरचे तहसीलदार करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष शरदराव जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत डावरे राष्ट्रवादी शहराचे उपाध्यक्ष गोविंदराव पवार व तेथील नागरिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा