*अकलुज ----प्रतिनिधी*
*शकूर ---तांबोळी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व शिक्षणाचा आनंदोत्सव सोहळा उत्साहात पार पडला . महषिॅ प्रशालेतील वाद्य वृंदातील कलाकारांनी वाद्यांच्या तालावर विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारापासून शाळेपर्यंत आणले.
सर्व नवीन प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शारदा मंदिर फुलून आले. कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सभापती नितीनराव खराडे, प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव ,कैलास चौधरी यांच्या शुभहस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गोड जिलेबी खाऊ वाटप व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी शुभेच्छा देत शाळा हे ज्ञानमंदिर असल्याची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब तसेच शास्ञज्ञ आर्किमिडीज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रमुख मान्यवरांचा सन्मान प्रशालेच्या वतीने पार पाडला. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
प्रशालेचे सहशिक्षक अभिजीत बावळे यांनी आर्किमिडीज या शास्त्रज्ञांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमासाठी भारत चंदनकर, शिवाजी थोरात, भाग्यश्री गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू यांनी केले तर आभार अंकुश एकतपुरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा