Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ जून, २०२४

*माळशिरस विधानसभेला उपरा उमेदवार चालणार नाही बौद्ध वा मातंग समाजातील स्थानिक उमेदवारच देण्यावर कार्यकर्ते आक्रमक*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण

येत्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात कोणताही उपरा उमेदवार चालणार नाही तर बौद्ध किंवा मातंग समाजातील उमेदवारच दिला जावा या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील सकल दलित बांधव आक्रमक झाले आहेत माळशिरस तालुक्यात या अगोदर दोन वेळा हनुमंत डोळस व एक वेळ राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे हनुमंत डोळस हे मुंबई व राम सातपुते हे बीड मधील बाहेरील उमेदवार होते त्यामुळे माळशिरस तालुक्यातील स्थानिक बौध्द व मातंग समाजावर मोठा अन्याय झाल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सावध पवित्रा घेतला आहे माळशिरस तालुक्यात बौध्द व मातंग समाज मोठ्या प्रमाणावर आहे तालुक्यात आंबेडकरी चळवळ परिवर्तन भुमिका सातत्याने बौध्द व मातंग समाज घेत असतो तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व या समाजाने केले आहे मात्र आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे नेणारे कार्यकर्ते यांना ऐन निवडणुकीत खड्या सारखे बाजूला सारले जाते आणि आयाराम गयाराम ऐतखाऊ भाडोत्री लोक इथल्या दलित समाजाच्या मानगुटीवर बसवले जातात अशी विद्रोही शब्दात इथल्या संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले आहे या संदर्भात माळशिरस तालुक्यातील कोणत्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे वर्चस्व न लादता तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते संघटना तसेच मातंग संघटना या सर्वांचे ऐक्य घडवून लवकरच या ऐक्य वादी नेते कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे 


 माळशिरस तालुक्यात बौध्द व मातंग समाज यांचे शिवाय इतर कोणताही उपरा उमेदवार स्विकारला जाणार नाही असे जाहीर आव्हानच आक्रमक कार्यकर्त्यांनी दिले आहे प्रस्थापित नेतृत्वाने जर बौध्द वा मातंग समाजातील उमेदवार डावलून उपरा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला तर तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे करुन आंबेडकरी चळवळीची ताकद दाखवली जाईल असा उघड इशारा देण्यात आला आहे तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते माळशिरस तालुक्यांत बौध्द व मातंग समाजांत संवाद साधण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात बौध्द व मातंग समाजातील कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा