*अकलुज---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
इंग्रजी भाषा आता मराठीमध्ये मिसळु लागली आहे.आपण बोलताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो याची आपल्याला कल्पनाही नसते.प्रा.अरूण खंडागळे सरांच्या चॅलेंज स्पोकन इंग्लिश कोर्स या पुस्तकामध्ये आधी इंग्रजी बोलायला शिकवतात,मग व्याकरणाचा सराव घेतात.यामुळे आता अनेकांची इंग्रजी शिकण्याची इच्छा पुर्ण होईल असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अभिनव आणि क्रांतीकारी अशा आधी बोलायला शिकवणाऱ्या व नंतर व्याकरणाचा सराव करायला लावणाऱ्या प्रा.अरूण खंडागळे लिखित चॅलेंज स्पोकन इंग्लिश कोर्स या बहुचर्चित पुस्तकाचे आज स्मृती भवन अकलूज येथे मदनसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर,प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे,प्रा.डॉ.धनंजय साठे,प्रा. डॉ.शरद कर्णे,प्रा.रविंद्र कोकरे,ॲड.एन.पी.शिंदे,सुरेश यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
मोहिते-पाटील पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आधी स्वतःतील दोष शोधावेत.त्यात सुधारणा केल्यास ते नक्कीच प्रगती करतील.इंग्रजी जागतिक भाषा बनल्यामुळे ती आपल्याला येणे गरजेचे आहे.इंग्रजी चांगल्या प्रकारे येत नाही म्हणून अनेक विद्यार्थी आयुष्यात चांगल्या संधींना मुकावे लागते.विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करावा.
डीआरडीओ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलेले जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर म्हणाले,प्रा.अरूण खंडागळे हे फक्त लेखक नसुन इंग्रजी भाषेतील शास्त्रज्ञ आहेत.आजवर बाजारात व्याकरणावर आधारीत इंग्रजी शिकवणारी अनेक पुस्तके आली.परंतु प्रा.खंडागळे यांनी यामध्ये संशोधन करून अत्यंत सोप्या पध्दतीने इंग्रजी शिकवणारे पुस्तक निर्माण केले आहे.इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञानभाषा झाली आहे.उच्च शिक्षणाबरोबरच उच्च नोकरी मिळवायची असेल तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवेच.
यावेळी चॅलेंज कोचिंग क्लासेसमधील इंग्रजी विषयात ९० च्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.डॉ.देविदास वायदंडे,डॉ.धनंजय साठे व लेखक प्रा.अरूण खंडागळे यांनी आले मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा