*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई - 05 जून :--लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा जवळपास ६०ने घटल्या आहेत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३००च्या आसपास जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एकीकडे रालोआ सत्तास्थापनेची तयारी करीत असताना दुसरीकडे इंडिया आघाडीनेही सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने आज बुधवारी नवी दिल्लीत विरोधकांच्या आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित होण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीकडून रालोआतील असंतुष्ट घटक पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात येते. त्यातही चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देसम पार्टी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला बरोबर घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ९ जूनला रालोआ किंवा इंडिया आघाडीच्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याची सर्वांना उत्सुकता आहे.
ठाकरे गटाने दिले होते संकेत
भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. इंडिया आघाडीच विजयी होणार असून विजय मिळाल्यावर २४ तासात आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा