उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज टेंभुर्णी मार्गावरील लवंग २५/४ येथे एक जुने गुलमोहरचे झाड आज सायंकाळी अचानक रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वहातुक विस्कळीत झाली होती. लवंग गांवचे कर्तव्यदक्ष सरपंच यांच्या नियोजनाने वहातुक सुरळीत चालू झाली.
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग २५/४ येथील एक जुने गुलमोहरचे झाड अकलूज टेंभुर्णी हमरस्त्यावर पडल्यामुळे सोलापूर व मराठावाड्याकडे जाणारी वहातुक जागच्या जागीच थांबली होती.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली असताना लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील यांना हि घटना समजताच क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चाने जेसीबी लावून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वहातुकीच्या मार्गातील अडथळा दूर केला त्यामुळे वहातुक पुन्हा पुर्वपदावर आल्यामुळे प्रवाशांनी निःश्वास टाकला. झाड साधारण साठ वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते .झाड पडण्याअगोदर कड - कड असा आवाज येऊ लागल्याने तेथील नागरिक सतर्क झाले त्यामुळेच धोका टळला आणि कोणतीही जीवित हानी झाली नाही .
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई नागरिकांना भासू लागली त्यावेळी सरपंच प्रशांत पाटील यांनी स्वखर्चाने बोअर मारून लवंग ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही त्वरित सोडविला होता.अशा कर्तव्य तत्पर खेड्यापाड्यातील लोकप्रतिनिधिंमुळेच देश सुखी संपन्न होईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा