*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
तुळजापूर येथील मुख्य भोपे पुजारी तथा तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूरचे माजी विश्वस्त स्वर्गीय माणिक (दादा) कदम पाटील यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त --मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था, मुंबई व एच. व्ही.देसाई हॉस्पिटल पुणे ,यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ जून२०२४ रोजी -बाबा पेट्रोल पंप समोर उस्मानाबाद रोड तुळजापूर येथे मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया व काळे चष्मे वितरण शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण २००० रुग्णांची नेञ तपासणी करण्यात आली यामध्ये 240 लाभार्थ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली तसेच 2200 लाभार्थ्यांची तपासणी करून १८०० नंबरचे चष्मे मोफत वाटप करण्यात आले
प्रारंभी स्व. माणिक (दादा) कदम पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली
याप्रसंगी धाराशिव (उस्मानाबाद)चे नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ,उस्मानाबादचे नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर, अंणदूरचे सरपंच -राम दादा आलुरे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज ( भैय्या )पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने ,अमर( भैया) मगर ,राहुल खपले, शहराध्यक्ष- सुधीर कदम, तालुकाप्रमुख- जगन्नाथ गवळी, देशमुख मालक, उपसरपंच -जुबेर शेख, चंदुकाका डांगे ,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा