*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;- 9730 867 448
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलाॅन मस्क यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) धक्कादायक दावा केला आहे.
एलाॅन मस्क म्हणाले की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचा वापर थांबवायला हवा. ऐवढेच नाही तर अमेरिकन निवडणुकांमधून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी देखील त्यांनी केली. स्पेसएक्सचे सीईओ एलाॅन मस्क यांनी हे व्यक्तव्य अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना केले आहे.
खरं तर, केनेडी ज्युनियर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोर्तो रिकोच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये ईव्हीएमशी संबंधित कथित मतदानाच्या घोटाळ्याबाबत टीका केली होती. एक्स वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये केनेडी ज्युनियर म्हणाले, "असोसिएटेड प्रेसच्या मते, पोर्तो रिकोच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित शेकडो मतदानात अनियमितता दिसली. सुदैवाने, एक पेपर ट्रेल होता, त्यामुळे यातील दोष ओळखला गेला. ज्या भागात पेपर ट्रेल नसेल त्या ठिकाणी काय होत असेल याची कल्पना करा. केनेडी ज्युनियर म्हणाले की, अमेरिकन नागरिकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की त्यांच्या प्रत्येक मताची मोजणी झाली आहे आणि निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार केला जाऊ शकत नाही.
ते पुढे म्हणाले की निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करावा लागणार आहे. केनेडी ज्युनियरच्या एक्स वरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एलाॅन मस्क म्हणाले की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत. ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिले की, "आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत. मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका कमी असला तरी हे मशीन हॅक केले जाऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) ही एक प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत जी निवडणुकीत मतांची नोंद करण्यासाठी आणि मोजण्यासाठी वापरली जातात. मतदान प्रक्रिया सोपी, जलद आणि विश्वासार्ह करणे हा या यंत्रांचा मुख्य उद्देश आहे. भारतात, लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुका अशा विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो.
ईव्हीएममध्ये दोन प्रमुख युनिट्स असतात
कंट्रोल युनिट : हे असे युनिट आहे जिथे निवडणूक अधिकारी मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. यात विविध बटणे आहेत ज्याचा वापर मतदान सुरू करणे, बंद करणे आणि मोजणे यासाठी केले जाते.
बॅलेट युनिट : हे असे युनिट आहे जिथे मतदार त्यांची मते नोंदवतात. या युनिटमध्ये उमेदवारांच्या नाव आणि चिन्हांसमोर बटणे आहेत. मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरील बटण दाबून त्यांचे मत नोंदवू शकतात.
भारतातील EVM ने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवली आहे, ज्यामुळे मतदारांचा आत्मविश्वासही वाढला आहे. मात्र, विरोधक अनेकदा ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. ईव्हीएममध्ये आणखी सुधारणा करून ते अधिक पारदर्शक करावे, अशी विरोधकांची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा