इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- - - सराटी ( ता.इंदापूर ) येथील तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांची मुक्कामासाठीच्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच पादुकांच्या निरा स्नानाचीही तयारी करण्याचे आदेश ग्रामपंचायत व प्रशासनाला बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी ( दि.११) रोजी पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे येणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मुक्कामात लागणाऱ्या जेवण, विसावा, शौचालय, अंघोळ आदि सुखसुविधा व पादुका स्नानाच्या ठिकाणच्या तयारीची पाहणी प्रसंगी प्रांताधिकारी बोलत होते.
यावेळी पालखीतळ, नीरा नदीकडे जाणारा पादुका स्नान रस्ता, सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी शुद्धीकरण तसेच नदीकाठी आपत्कालीन व्यवस्था करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व प्रशासनाला देण्यात आल्या.
पादुका स्नान करिता निरा नदीत पाणी सोडण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
यावेळी पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी वैभव नावडकर, डिवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप, आरोग्य विस्तार अधिकारी बाबर साहेब, विस्तार अधिकारी कृषी युनुस शेख, सराटी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, ग्रामसेवक साळुंखे तसेच तलाठी, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - सराटी येथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा नियोजनाची पाहणी करताना.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा