*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर येथील तुळजाई नगर भागातील ड्रेनेज लाईन रस्त्याचे काम करताना पूर्ण फुटलेली असून त्यामुळे संपूर्ण कॉलनी मध्ये ड्रेनेज चे पाणी संपूर्ण कॉलनीत पसरल्यामुळे संसर्गशिगजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याने ड्रेनेज लाईनचे काम करूनच उर्वरीत रस्स्याचे काम करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तुळजाई नगरचे ड्रेनेजचे कामकाज करूनच उर्वरित रस्त्याचे काम करावे व आम्हाला न्याय दयावा अन्यथा आम्हाला सनदशीर मागीने आंदोलन करावे लागेल.असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर लखन कदम, लालासाहेब मगर, छात्रसेन देशमुख, तानाजी भोसले, डी.डी.हुंडेकरी, उमेश नलावडे, संजय वाघमारे, सोमनाथ केवटे,डी.टी.घोडके,डी.एम.चव्हाण,मैंदर्गी सर,तांबे सतीश,रविकांत धर्माधिकारी,भालेराव सर, चव्हाण राजू ,जगताप आदींच्या स्वाक्षरी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा