Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ जून, २०२४

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी फुलांचा हार फेटा व गुलाब पुष्प देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माढा लोकसभेच्या नूतन खासदार पदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल शिवशंकर बजार अकलूज येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे तालुका कार्याध्यक्ष संतोष गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे पुणे जिल्हा प्रवक्ता ऋषिकेश दळवी पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उगाडे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी आकाश गायकवाड अभिषेक पवार मन्सूर काझी रियाज बागवान राहुल कोळी विजय कोळी अर्जुन कोळी विजय जाधव अजय कोळी अक्षय जाधव राजू जाधव समाधान मदने लखन पवार प्रशांत पवार दीपक शिरतोडे सुरज जाधव समाधान चव्हाण युवराज मसुगडे भैया जाधव यांचेसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा