Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ जून, २०२४

*इंदापूर शहरातील मालोजीराजे यांच्या गडीवरील दोनशे वर्षांपूर्वीचे तोडलेले चिंचेचे झाड व मारले गेलेले पक्षांच्या स्मृती प्रित्यार्थ श्रद्धांजली..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो;- 9730 867 448

एक वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने इंदापूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली . .

पक्षांची व झाडांची मागितली माफी

 इंदापूरकर तळमळले असे पुन्हा होणार नाही तुम्ही येत जा हजारो वर्षाची परंपरा व आवक जावक बंद करू नका पक्षांना केली विनवणी 

झाडे तोडणारांना व पक्षी मारणारांना कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचा निश्चय . 

इंदापूर आज पासून बरोबर एक वर्ष पूर्वी इंदापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीवरील अति प्राचीन असलेले दोनशे वर्ष पुर्वीचे चिंचेचे झाड इंदापूर नगरपालिकेने अचानकपणे तोडल्यामुळे त्या झाडावरील असंख्य चित्र बालक पक्षी मृत पावले हे पक्षी ट्रॅक्टरचा ट्रेलर भरून एवढे प्रमाणात मारले गेले तो दिवस होता 16जुन 2023 या गोष्टीला आज बरोबर एक वर्ष झाले या झालेल्या दुर्घटनेची व चुकीच्या घटनेमुळे तोडले गेलेल्या झाडाच्या बुंध्यापाशी व पक्षांच्या निवासाच्या ठिकाणी आज बहुसंख्य इंदापूरकर नागरिक एकत्र जमून इंदापूरकरांच्या वतीने पक्षी व झाडांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघर्ष समितीचे हमीद भाई आत्तार , महादेव चव्हाण सर , प्रा बाळासाहेब मखरे ,हाजी सलीम भाई बागवान , माजी उपनगराध्यक्ष सादिक भाई बागवान यांच्या हस्ते चिंचेचे झाड तोडले होते त्या झाडाच्या बुंध्याचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाची सुरुवात सेवानिवृत शिक्षणाधिकारी पुष्पराज जमदाडे यांचे श्रद्धांजली पर गायनाने झाली . तसेच मोहन राऊत गुरुजी ,फकीर भाई पठाण, दादासाहेब पिसे . शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते पक्षांना धान्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले यावेळी बोलताना इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे म्हणाले की आमच्या शहरातील एक अति प्राचीन चिंचेचा वृक्ष इंदापूर नगरपालिकेने पाडल्यामुळे त्या झाडावरील असंख्य चित्र बालक पक्षी मृत झाले ही दुर्दैवी घटना आहे हजारो वर्ष पूर्वीपासून हे पक्षी जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत आमच्या परिसरात येतात त्यांची घरटी करतात त्या घरट्यामध्ये ही पिले अंड्यातून निर्माण होतात व पक्षाची नवजीवन सुरू होते अशा परिस्थितीत आमच्याच गावाच्या संस्थेने हे झाड पाडले ही दुर्दैवी घटना आहे या घटने मुळे पक्षांची आणि झाडांची झालेली अपरिमित हानी भरून येणार नाही या चुकीच्या गोष्टीविरुद्ध आमचा वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे पक्षाला आणि झाडाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ज्या लोकांनी निष्काळजीपणे हे गैरकृत्य केले त्यांच्यावर शासनाला आज ना उद्या कारवाई करावीच लागेल अशा चुकीच्या घटनांमुळे निसर्गातील झाडे पक्षी त्यांची अंडी घरटी धोक्यात येत असून त्यामुळे लयाला जाण्याची शक्यता आहे पुढे इंदापूर मध्ये अशी घटना होणार नाही याची आम्ही सर्व इंदापूरकर नागरिक जागृत राहून काळजी करू व निसर्गाचे जपणूक करू शहरांमध्ये असंख्य झाडे लावू पक्षांसाठी निवासस्थाने घरटी त्यांची अंडी सुरक्षित राहतील याची काळजी घेऊ जी घटना झाली त्या घटनेबद्दल इंदापूरकरांना तीव्र वेदना झाल्या असून झालेल्या घटनेबद्दल आम्ही पक्षी झाडे निसर्ग यांची माफी मागतो व पक्ष्यांनो यापुढेही पूर्वीप्रमाणेच जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आपण येत रहा असे विनवणी करतो यानंतर इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे सर यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी बोलताना ते म्हणाले की घडलेली घटना दुर्दैवी होते इंदापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडली आहे या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही नागरिकांनी झाडांचे आणि पक्षाचे संरक्षण करावे याप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे म्हणाले की या दिवसानिमित्त आज आम्ही इंदापूर शहरवासीय पक्षांसाठी गहू ज्वारी मका यासारखे धान्य सर्वत्र ठेवत असून जे दुर्दैवी घटना घडली त्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ निसर्ग पक्षी झाडे याच्यावरती मानवी जीवन अवलंबून असून माणसाने पक्षी प्राणी मारल्यामुळे व झाडे तोडल्यामुळे सातत्याने उष्णतामान वाढत आहे मनुष्य जीवन धोक्यात आले आहे माणसाने आता तरी सावध होऊन झाडे लावावीत झाडे जगवावी यानंतर सर्वांच्या वतीने वृक्षारोपणाची सुरुवात म्हणून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले .

याप्रसंगी संघर्ष समितीचे प्रमुख 

प्रा . कृष्णा ताटे, अर्बन बँकेचे मच्छींद्र शेटे, दादा पिसे, हमीदभाई आत्तार . रमेश आबा शिंदे . महादेव चव्हाण , हाजी सलीम भाई बागवान .मेजर बजरंग शिंदे .फकिर पठाण . धरमचंद लोढा , पुष्पराज जमदाडे .मोहन राऊत गुरुजी . भारत बोराटे. सादिकभाई बागवान, प्रशांत सिताफ, श्रीकांत मखरे ' अनिल चव्हाण. रमेश बनसोडे . सुनिल यादव . रघुनाथ खरवडे . शिवाजी जाधव नाना फोंडे . पांडूरंग पवार . इ . संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

यावेळी झाडाची आठवण म्हणून हाजी सलीमभाई बागवान , मेजर बजरग शिंदे. प्रशांत सिताफ श्रीकांत मखरे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा