Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ जून, २०२४

*दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक "दादा गावडे " यांचा सेवा निवृत्ती निमित्त सन्मान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

माळीनगर -येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगरचे वरिष्ठ लिपिक दादा शंकर गावडे आपल्या २७ वर्षे सहा महिने प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा प्रशाले तर्फे सहपत्नीक शाल फेटा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार व वरिष्ठ लिपिक सुधीर देवळालीकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांचे दाखला तयार करणे आधार कार्ड अपडेट बोनाफाईड यासारखी महत्त्वाची कामे त्यांनी केली संस्थेच्या सहकार्यामुळेच मी चांगली सेवा बजावू शकलो त्याबद्दल त्यांनी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.रणजित लोहार, शरद नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी त्यांच्या पत्नी नंदाबाई मुलगी दीप्ती तसेच जावई गणेश दौडे उपस्थित होते

  कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक कल्याण कापरे सुनील जवरे वसंत पिंगळे किशोरी चवरे उमा महामुनी सविता पोटे रूपाली नवले नामदेव जोशी नाना भोंग स्वप्निल नागटिळक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आभार जगन्नाथ कोळी यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा