*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती येथे कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची पुण्यतिथी विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक . प्रताप तोरणे यांनी केले त्यावेळी त्यांनी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच शाळेचा उल्लेखनीय आलेख मांडत कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव राजाराम कदम, सभापती, कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती हे होते. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रामचंद्र गजाबा गायकवाडसाहेब , व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचा यथोचित सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रताप तोरणे सर व पर्यवेक्षक दगडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यालयात जे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अशा विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम कु. साक्षी संजय काटकर हिने ८९.००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला तर कु. सत्यराणी देविदास शिंदे या विद्यार्थिनीने ८७.२० ℅ गुण मिळवून विद्यालयांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. अंजली अमोल वायदंडे या विद्यार्थिनीने ८१.८०% गुण मिळवून विद्यालयांमध्ये तृतीय क्रमांक येण्याचा मान मिळवला या यशाबद्दल ॲल्युमिनी असोसिएशन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पुणे या संस्थेचे सचिव प्रा. डॉ. जनार्दन राजाराम कदम साहेब यांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे रक्कम 5000, 4000, व 3000 रुपयाचा धनादेश ,तसेच रामचंद्र गजाबा गायकवाड यांच्या वतीने ५०१,३०१,२०१ रु. चे रोख पारितोषिक, प्रशालेचे सहशिक्षक संतोष अनगळ सर यांचे कडून अनुक्रमे २५१,१५१,१०१रु. चे रोख पारितोषिक देऊन व पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थी चि. सर्वज्ञ अशोक दांगट (इ ५ वी), २) कु. श्रवणी दत्तात्रय काटकर (८ वी) ३) चि. जय नवनाथ सोनटक्के (८ वी )उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख १०१, १०१,१०१ रु चे पारितोषिक मुख्याध्यापक प्रताप तोरणे सर यांनी दिले व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी कु श्रावणी चव्हाण हिने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रासंगिक प्रकाश टाकला तसेच ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला त्या विद्यार्थ्यांनी हे आपल्या भाषणातून शाळेविषयी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी शाळेचे ऋण व्यक्त केले व इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळवून यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले. विद्यालयातील सहशिक्षक . महादेव आठवले सर यांनी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब यांच्या जीवनावर सविस्तर भाषण केले तसेच आईची महती सांगणारे एक गीत गाऊन सर्वांची मने जिंकली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कदम यांनी कै. आक्कांच्या जीवनातील प्रसंग सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेचा नाव लौकिक वाढवा, आई वडिलांचे नाव मोठे करा असाही मोलाचा सल्ला दिला. तसेच मनोगतातून त्यांनी शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांची प्रगती व विकास यावर प्रकाश टाकला व समाधान व्यक्त केले . त्यानंतर पुण्यतिथीचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभहस्ते गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मनशक्ती विज्ञान केंद्र, अकलूज, खा. धैर्यशील भैय्या मोहिते पाटील मित्र परिवार व विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज समन्वयक . गणेश खडके यांचे वतीने गरजू , अभ्यासू व होतकरू १५ विद्यार्थ्यांना गणवेश दिले. त्यानंतर मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या सहशिक्षिका कु. धाईंजे मॅडम व . संतोष अनगळ यांनी केले . अशा प्रकारे विविध उपक्रमांनी कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ आक्कासाहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा