Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

*शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात व्यसनाच्या आहारी जाऊ नये---- प्रा. धनंजय देशमुख*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादन व्यसनमुक्ती चे प्रा धनंजय देशमुख यांनी केले.ते महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे अन्न व औषध प्रशासन , पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बोलत होते. ते पुढे म्हणाले'शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाचे सेवन व्यसनाधीन होण्यासाठी करत नाहीत तर काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भविष्याची चिंता,अभ्यासाचे ओझे, करीअरच्या अनावश्यक अपेक्षा यामुळे ताण तणाव निर्माण होतात ते तणाव कमी करण्यासाठी आणि अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अंमली पदार्थाचे सेवन करतात काही मुलीही अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू लागलेल्या आहेत' . कार्यक्रमाचे अध्यक्ष माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये 'विद्यार्थ्यांनी अभ्यास बरोबरच इतर छंद जोपसले पाहिजे कि ज्यामुळे ते व्यसनाकडे ओढले जाणार नाहीत असे प्रतिपादन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर ,पत्रकार रवि शिरढोणे,कृष्णा लावंड,औदुंबर भिसे, पर्यवेक्षक ए. एस.एकतपुरे, उपमुख्याध्यापक भारत चंदनकर,शिक्षक प्रतिनिधी शिवाजी थोरात,किरण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.



  या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभावती लंगोटे,मनोज

सरवदे,क्रिडा शिक्षक अनिल मोहिते शैलेश माने,केतन नकाते यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री उरवणे यांनी तर आभार सुखदा विधाते मँडम यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा