Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

माळीनगर येथे शाळा प्रवेश उत्सवामध्ये नूतन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे शाळा प्रवेशोत्सवामध्ये सर्व प्रवेशार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांचे उत्स्फूर्तपणे फुलांच्या पाकळ्यात,हातात फुगे देवून टाळ्यांच्या गजरात व "स्कूल चले हम" या गीतावर मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

                या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार होते.प्रारंभी थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या प्रवेशोत्सव थीमने अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे,उमा महामुनी तसेच पालक संजय नेवसे, बळीराम चव्हाण,आतिश मंगळवेढेकर संग्राम भोसले, भाग्यश्री सावंत उपस्थित होते.     

          यावेळी नवीन प्रवेशार्थी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अबोली चव्हाण,प्रतीक्षा नवगिरे,शाहिस्ता काझी,पूजा मोरे,गौरी बेंद्रे,श्रीनंदन घुले,अल्फाज खान,पृथ्वीराज चव्हाण,शौर्य बांदल यांना पदाधिकारी व पालकांच्या हस्ते शालेय पुस्तके भेट देण्यात आली.

         या कार्यक्रमाचे निमित्ताने शिवराज नेवसे,प्रतीक्षा बोरावके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर पालक संजय नेवसे,भाग्यश्री सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व शाळा परिसर सीसीटीव्ही युक्त करण्यात आल्याचे तसेच शिस्त व अध्यापनाकडे विशेष भर असल्याचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार यांनी सांगितले. 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा