Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १३ जुलै, २०२५

*कृषी विस्तार अधिकारी -"अनिल सावळजकर" यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

बचेरी येथील अनिल लक्ष्मण सावळजकर, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस, येथील प्रदीर्घ सेवेनंतर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा महालक्ष्मी मल्टिपर्पल हॉल, पिलीव येथे आयोजित करण्यात आला. होता सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार

 धैर्यशील मोहिते -पाटील, यांच्या शुभ हस्ते शाल, फेटा, बुके देऊन सन्मान करण्यात आला,सदर कार्यक्रमांस अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते -पाटील, मान जिल्हा परिषद सोलापूर मा.कृषी व पशुसंवर्धन समितीचे संग्रामसिंह जहागीरदार शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील आदी मान्य वर उपस्थित होते अनिल सावळजकर यांच्या सेवा पुढची बद्दल सन्मान करून आपली मनोगते व्यक्त केली व भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समलिंग सावळजकर यांनी केले व कार्यक्रमचे सूत्रसंचलन गुजर गुरुजी यांनी केले.सदर कार्य क्रमांस पिलीव, सुळेवाडी, तांदुळवाडी, मळोली, यशवंतनगर, बचेरी येथील सरपंच, उपसरपंच, नागरिक, सांगेसोयरे, पाहुणे मंडळी, मित्र मंडळी बहुसंखेने उपस्तित राहून अनिल सावळज कर यांचा शाल, श्रीफल, पुष्पहार, पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला. सयाजीराजे मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त करून अनिल सावळजकर यांना सेवा निवृत्तीनंतरच्या काळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमामध्ये कु. अबोली, . गुळवे (मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती, माळशिरस ), सिद्धेश्वर धसाडे गुरुजी व इतर मित्रमंडळींनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शेवटी अनिल 




    सावळ जकर यांनी आपले कार्याविषयी मनोगत व्यक्त करून सर्वांप्रती ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे व सर्वनागरिकांचे, पाहुण्यांचे, मित्रांचे संतोष सावळजकर यांनी आभार मानले. शेवटी सर्वांनी स्नेहभोजंनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा