Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

*"योग" ही आपल्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे---- प्रा.अमोल फुले*

 



*अकलुज---प्रतिनिधी*

 *शकूर तांबोळी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात मोठ्या उत्साहात आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो. योग ही आपल्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन आणि शरीर, विचार आणि कृती यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देते. योग हा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी एक सर्वांगीण मौल्यवान दृष्टीकोन आहे. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही; तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकत्वाची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे. भारताने सर्व जगाला योगाची ओळख करून दिली. अशी माहिती दिली. 



तसेच योगाचार्य गोरख डांगे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे योगाचे प्रकार दोन तास करून दाखवले. विद्यार्थ्यांनी ही आवडीने केली. तसेच आपल्यासाठी योग करण्याचे महत्त्व सांगितले. दररोज सकाळी एक तास योगा करा असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. या दिवसाचा उद्देश योगाच्या असंख्य फायद्यांबद्दल, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. "योग" हा शब्द संस्कृत मूळ "युज" पासून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे," "जोखडणे" किंवा "एकत्रित होणे." योग मन आणि शरीर, विचार आणि कृती, संयम आणि पूर्तता आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद दर्शवतो. अशीही माहिती दिली. या योग दिनानिमित्त विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य झाकिर सय्यद, बीपी शिंदे, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी उपस्थित राहुन वेगवेगळे योग प्रकार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा