*श्रीपूर--बी.टी.शिवशरण
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ. . प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते व व्हा. चेअरमन .कैलास खुळे, व सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी सांगितले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2024-25 साठी सुमारे 10,500 हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी झालेल्या असून त्यामध्ये आणखी 1500 ते 2000 हेक्टर क्षेत्राच्या वाढीव नोंदी होतील असा अंदाज आहे. या हंगामात कारखाना पुर्ण क्षमतेने चालणार असून त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेसाठी आवश्यक असणाऱ्या तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार सुरू आहेत. या हंगामात कारखान्यास सुमारे 400 ते 450 ट्रक, ट्रॅक्टर, 300 ट्रॅक्टर बजॅट व 200 ते 250 बैलगाडीची आवश्यकता असून आवश्यकतेप्रमाणे सर्व करार करण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, गळीत हंगाम 2023-24 ची कारखान्याची एफ.आर.पी प्रती मे.टन रक्कम रु.2500/- असतानाही या हंगामात गाळप झालेल्या ऊसास एफ.आर.पी. पेक्षा रक्कम रु.300/- जादा देवून प्रती मे.टन रक्कम रु.2800/- प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे. तसेच तोडणी व वाहतूक ठेकेदारांची बिले अदा केली आहेत. पाठीमागील हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ऊस उत्पादकांना पाणीटंचाईशी सामोरे जावे लागले आहे. परंतु सध्या कार्यक्षेत्रात झालेल्या समाधानाकारक पाऊसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी टनेजमध्ये वाढ होणार असून कारखान्यास अपेक्षेप्रमाणे गाळप करता येणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक .दिनकरराव मोरे, .दिलीपराव चव्हाण, .ज्ञानदेव ढोबळे, .तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, .भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, .विजय जाधव, हनुमंत कदम, .किसन सरवदे, दाजी पाटील, .दिलीप गुरव, .सिताराम शिंदे, .शामराव साळुंखे, राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा