इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- नीरा नदीला आठ महिन्यानंतर पहिल्याच पावसाचे पाणी आल्याने नदी खळखळून वाहू लागली आहे. परंतू सराटीसह अनेक बंधाऱ्यांची ढापे काढली नसल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ढापे काढण्यास हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर नुकसानीस जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. तर तुकाराम महाराज पादुका स्नानासाठी वरूणराजाने कृपा केल्याने भाविक भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
नीरा नदी मागील वर्षीच्या पावसाळ्याच्या शेवटी वाहत असताना यावरील जवळपास सर्वच बंधाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात ढापे टाकून पाणी अडवण्यात आले होते. परंतू जलसंपदा विभागाच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. वेळेत पाणी अडवण्यात आले नसल्याने वर्षअखेरीसच अनेक बंधारे कोरडे पडले होते. त्यानंतर जवळपास आठ महिने नदीतील पाणी आटल्याने बंधारे कोरडे पडले. त्याचा मोठा फटका शेतीला बसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राने नीरा नदी पट्ट्यातील गावात जोमदार हजेरी लावली. त्यामुळे नीरा नदीला पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने नदी खळखळून वाहू लागली आहे. परंतू जलसंपदा विभाग पावसाळ्याला सुरूवात होवूनही अनभिज्ञ राहिल्याने बंधाऱ्यांची ढापे काढली नसल्याने मोठे नुकसानीचा संभव व्यक्त होत आहे.
तसेच जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे ११ जुलैला येणार आहे. तर १२ जुलैला पादुकांना निरा स्नान घातले जाणार आहे. आठ महिने कोरडी पडलेली नदीमुळे पादुकांना टॅकरच्या पाण्याने अंघोळ घालण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र वरूणराजाच्या कृपेमुळे नीरा नदी खळखळून वाहू लागल्याने आता नीरेच्या पाण्याने पादुका स्नान घातले जाणार असल्याने वारकरी, भाविक व नागरिकांनी आनंद व्यक्त केला जात आहे.
फोटो - सराटी येथील नीरा नदीला पावसाचे पाणी आल्याने नदी खळखळून वाहू लागली आहे. तर ढापे तसेच असल्याने नुकसानीची शक्यता वाढली आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा