*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी हा एक स्तंभ आहे. हज यात्रा करणे हे प्रत्येक मुस्लिमांचे स्वप्न असते. प्रत्येक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करतो.
आता भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा देखील हजच्या यात्रेला निघाली आहे. हज यात्रेला जाण्यापूर्वी सानिया हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत सानिया हिने कृतज्ञता व्यक्ती केली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सानिया हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सानिया म्हणाली, ‘अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हज येथे जाण्याची संधी मिळत आहे. मी या परिवर्तनीय अनुभवाची तयारी करत असताना, नम्रपणे कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी तुमची क्षमा मागते. माझं मन कृतज्ञतेने भरलेलं आहे. अल्लाह माझ्या प्रार्थना स्वीकारेल… अशी आशा करते.
सानिया पुढे म्हणाली, ‘मी खूप भाग्यवान आहे आणि मी खूप कृतज्ञ आहे. मी आता नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. त्यामुळे कृपया मला तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत ठेवा. मी नम्र अंतःकरणाने आणि मजबूत इमानाने एक चांगली व्यक्ती म्हणून परत येईल आशा करते…’ असं देखील सानिया म्हणाली.
खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे सानिया
सानिया मिर्झा हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर शोएब याने तिसरं लग्न केलं आहे. तर सानिया मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.
सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब त्याच्या खासगी आयुष्यात पुढे गेला आहे. शोएब आणि सना यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा