इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
:::: गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील मच्छीमारांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. यावर्षी देखील उजनी जलाशयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी
मत्स्य बीज सोडले जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ ग्रीन सिग्नल दिला.
यामुळे इंदापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यातून मच्छीमार बांधवांचा रोजगाराचा प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीवरून तालुक्यातील मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता.
यावर्षी देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. अजित पवार यांनी भरणे यांच्या मागणीवरून तत्काळ मत्स्यबीज सोडण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा