Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

गिरवी ( ता इंदापूर ) व गणेशगाव ( ता. माळशिरस ) यांना जोडणारा कोल्हापूरी बंधाऱ्याचा भराव तिसऱ्यांदा वाहून गेला, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147

-- - गिरवी ( ता इंदापूर ) व गणेशगाव (ता. माळशिरस) यांना जोडणारा नीरा नदीवरील बंधारेचा भराव पुराच्या पाण्याच्या रेट्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला आहे. त्यामुळे गिरवी गणेशगाव मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर काम करणारे ठेकेदार व जलसंपदा विभाग यांच्या बद्दल शंका निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही बंधाऱ्याची ढापे न काढणाऱ्यांवर कारवाई होणार का? 



    गिरवी ( ता इंदापूर ) व गणेशगाव ( ता माळशिरस ) यांना जोडणारा नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. गिरवी बाजूकडील जवळपास दोनशे ते तीनशे फूट एवढा असणारा भराव पाण्याच्या रेट्यामुळे वाहून गेला आहे. तसेच बंधाऱ्याच्या अनेक पिलरलाही पाण्याच्या रेट्यामुळे धोका निर्माण झाल्याची शेतकऱ्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका बंधाऱ्याला बसला आहे.

    मागील आठ महिन्यापासून नीरा नदी पाण्याअभावी कोरडी पडली होती. त्यामुळे शेतातील पिके करपून जावून शेती ओसाड पडली होती. मागील वेळी पडलेले भगदाड सरावाने भरून घेण्यात आले होते. मात्र विर धरणातून नीरा नदीला सोडलेल्या पाण्याचा रेट्यामुळे बंधाऱ्याचा भराव पुन्हा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या समोर पिके वाचवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.



    दरम्यान खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी यामध्ये लक्ष घालून निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का? असा सवाल केला जात आहे.

चौकट - विर धरण व परीसरात झालेल्या पावसामुळे धरण भरल्याने शुक्रवारी ६८४४४ क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे तावशी पासून नरसिंहपूर पर्यंतचे बंधाऱ्यांवरून चार फुट पाणी वाहत आहे. तर पाऊस कमी झाल्याने शनिवारी पाणी कमी करून तेरा हजारांचे सोडले जात आहे. पण जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसून पुन्हा शेती ओसाड राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

फोटो - गिरवी ( ता इंदापूर ) व गणेशगाव ( ता. माळशिरस ) यांना जोडणारा कोल्हापूरी बंधाऱ्याचा भराव तिसऱ्यांदा वाहून गेला आहे.

................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा