Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

-*--;**पंचनामा लाच प्रकरणाचा*;---** *मंगळवेढा येथे 14 दिवसात 2 * लाच लुचपत प्रकरणाच्या धाडी पडल्यामुळे महसूल विभागाला आहे आत्मपरीक्षण करण्याची गरज*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

मंगळवेढा महसूल विभागात १४ दिवसात सोलापूर लाचलुचपत विभागाच्या दोन वेळा धाडी पडून तिघांना गजाआड होण्याची वेळ आल्याने महसूल विभागाला या लाच प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. 


दरम्यान या पडलेल्या दोन धाडीमुळे मसहूल खाते पुरे बदनाम झाल्याने पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी हा विषय गांभीर्यपुर्वक हाताळून महसूल विभागाची बदनामी करणार्‍यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


मारापूर मंडलचे मंडल अधिकारी चंद्रकांत इंगोले यांनी आपल्या स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करुन तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांचे नावे असलेली शेतजमीन रजिस्टर बक्षिसपत्राव्दारे मोठ्या भावाच्या नावे करुन दिली होती. तलाठी यांनी ऑनलाईन नोंद करुन ती सर्कलकडे मंजूरीसाठी पाठविल्यावर मंजूर करण्याकरिता ८ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ५ हजार रुपये स्विकारताना दि.१३ जून २०२४ रोजी ५.१५ वाजता लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही घटना घडून एक आठवडा संपेपर्यंत दुसरी घटना घडली. 


यामध्ये वाळूचे जप्त वाहन सोडण्याकरिता मंगळवेढा प्रांत कार्यालयातून आदेश मंजूरीसाठी २० हजाराची लाच मागून तडजोडी अंती ५ हजार रुपये स्विकारताना प्रांत कार्यालयातील नायब तहसिलदार प्रकाश सगर,महसूल सहाय्यक विवेक ढेरे हे दोघे दि.२८ जून २०२४ रोजी लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. या केवळ १४ दिवसात लाच स्विकारण्याच्या दोन घटना घडल्यामुळे मंगळवेढ्यातील महसूल खाते पुरे बदनाम झाल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावर आत्मपरिक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. 


अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठ्या आकड्यात पगारी असतानाही गोरगरीब नागरिकांंची काम करणे कर्तव्य न समजता तो एक उपकार समजून लाच स्विकारण्याचा राजरोस गोरखधंदा सुरु असल्याच्या नागरिकांमधून चर्चा सुरु आहे. 


काही महिन्यापुर्वी प्रांत कार्यालयात राष्ट्रीय महामार्गातील बाधीत झालेल्या एका शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्यापोटी लाच स्विकारताना एका तलाठ्याला जेल मध्ये जाण्याची वेळ आली होती. 


 तत्पुर्वीही रेशन दुकानदाराकडून मंथली घेताना तत्कालीन पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते.


 या सर्व घटना एक वर्षाच्या आत घडल्यामुळे महसूल खाते पुरे बदनाम होत आहे. 


मंगळवेढ्यात लाच स्विकारण्यात महसूल खाते अव्वल ठरल्याचा बोलबाला सुरु आहे.

 

सांगोला-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गात अनेक शेतकर्‍यांच्या जमीनी संपादीत केल्याने त्याची नुकसान भरपाई प्रांत कार्यालयाकडून मोजमाप होवून मिळते, 

मात्र यामध्ये शेतकर्‍यांना शासकीय मोबदला सहजासहजी न मिळता त्यामध्ये टक्केवारीचा हिशोब लावला जात असल्याचे तलाठ्याला लाचलुचपतने पकडल्यानंतर ही घटना उघड झाली आहे. 


अजूनही महसूल प्रशासनास शहाणपणा न सुचता टक्केवारीचा प्रकार सुरु असल्याची नागरिकांची चर्चा आहे. 


परवाच्या धाडीमध्ये लाचलुचपत विभागाने दि.२६,२७,२८ जून २०२४ रोजी सलग तीन दिवस प्रांत कार्यालयाला सापळा लावल्यानंतर हा सापळा यशस्वी झाला आहे.


 मारापूरचे मंडल अधिकारी यांना मागील दोन दिवसापुर्वी जामीन झाला असून अद्याप एक अधिकारी व एक महसूल सहाय्यक जेलची हवा खात आहेत. 


या सर्व घटनांमुळे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असून पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी मंगळवेढ्याच्या मसहूल कारभारावर गांभीर्यपुर्वक लक्ष घालून प्रशासनातील कारभार स्वच्छ करावा अन्यथा भविष्यात येणारे दिवसही वाईट असतील असा इशारा सुज्ञ नागरिक या घटनेवरुन देत आहेत.

     पुणे विभाग महसूल आयुक्त यांनी येथील प्रशासनाचा कारभार स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा