Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जुलै, २०२४

*शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान* *30 हजार भाकरींचे वाटप व 11 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग*

 


*अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या १० शाखेतून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे ३० हजार भाकरी व १२५ किलो बेसनाचे पिठले,ठेचा,लोणचे,कांदा अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान वाटपाचा प्रारंभ संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील प्रमुख उपस्थित होते.या उपक्रमात संस्थेच्या सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. 



             श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. १२ जुलै रोजी अकलूज (जि.सोलापूर) येथे आगमन होते. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि.पूणे) येथे असतो.सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असल्याने व अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात.आदल्या दिवशी मुक्कामास येणाऱ्या वैष्णवांनाही अन्नदान व्हावे,त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा या हेतूने जयसिंह मोहिते पाटील यांनी सन २०१५ पासून शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदानाला सुरुवात केली.तीच परंपरा अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.अन्नदान वाटपाचे हे १० वे वर्ष आहे.



अकलूज सराटी महामार्गावर झालेल्या या अन्नदानात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ९ हजार विद्यार्थी अन्नदानात सहभागी झाले.येथे २१ हजार भाकरी, ७० किलो बेसन पिठलं, ठेचा,लोणचं,कांदा असा ग्रामीण भोजनाचा आस्वाद वैष्णवांना दिला.   



          तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर यांच्या वतीने मांडवे (ओढा) विसावा येथे दि.१२ जूलै रोजी ५ हजार भाकरी व २५ किलो बेसन,ठेचा,लोणचे असे अन्नदान होत असून यामध्ये सुमारे १ हजार ३०० विद्यार्थी सहभागी होत आहेत व वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, प्राथमिक,माध्यमिक व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर यांच्या वतीने दि.१३ जूलै रोजी ४ हजार भाकरी २५ किलो बेसन, ठेचा,लोणचं असे अन्नदान होत असून या मध्ये १ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत. 

        यावेळी मुख्याध्यापक संजय गळीतकर,अमोल फुले, शिवाजी पारसे,मुख्याध्यापिका सौ सुनीता वाघ,प्रा.राहुल सुर्वे, अनिल पिसे,विजय निंबाळकर, दत्तू सरतापे,प्रा.मनोज नांगरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा