Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जुलै, २०२४

फिनिक्स इंग्लिश स्कूल २५/४ लवंग मध्ये दिंडी सोहळा संपन्न .

 


नूरजहाँ शेख ....उपसंपादक

टाइम्स 45 न्यूज मराठी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केलेले आहे. सर्व लहानथोरांपासून आबालवृद्धांपर्यंत मोठ्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरला पायी जात असतात. याचेच निमित्त साधून फीनिक्स इंग्लिश स्कूल मध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम, वासुदेव, वारकरी यांचे पोशाख परिधान केले होते. पालखीचे पूजन नलिनी चव्हाण, यांच्या हस्ते केले. बाल वारकऱ्यांची दिंडी विठूरायाचा नाम घोष करत २५/४ लवंग परिसरातून पुढे जात असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे विठ्ठल रुक्मिणी यांच पूजन करून ओवाळले. सर्व बाल वारकऱ्यांनी भजन, अभंग, गवळणी म्हणत आणि नाचत खेळत हाती पताकाध्वज, तुळशी वृंदावन घेऊन कपाळाला टिळा लावून मुखात 'ज्ञानोबा- तुकाराम' चा जयघोष करत शाळेचा परिसर दुमदुमून टाकला. याप्रसंगी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता महादेव कोळेकर ,निलेश वाघ,



पृथ्वीराज मिटकल ,भीमराव शिंदे अनिल भोसले,प्रशांत कोरे यांनी बाल दिंडीतील वारकऱ्यांना खाऊ वाटप केला व दिंडी यशस्वी होण्यासाठी बळीराम राऊत , जयश्री जाधव , राही अंधारे शिक्षिका गुलशन शेख ,तमन्ना शेख या सर्वानी विषेश प्रयत्न केले .

 शाळेच्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा