*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आरोग्य विभाग,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने मोफत प्रथमोपचार,आरोग्य तपासणी शिबीर कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज येथे आयोजित करण्यात आले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा,कुलसचिव डॉ. योगिनी घारे,राष्ट्रीय सेवा योजना विभाग सोलापूर विद्यापीठाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे, विद्यापीठ आरोग्य विभागाचे संचालक डॉ.अभिजित जगताप, इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय सिद विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन गायकवाड,डॉ.केदारनाथ काळवले,डॉ.चंद्रकांत कोळेकर, शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे
प्राचार्य,डॉ.शिवप्रसाद टिळेकर, वीरभद्र दंडे,डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.आनंद पवार,डॉ.अरविंद कोळेकर उपस्थित होते.
कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूजचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन सर्व मान्यवरांचे सत्कार केले.यावेळी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवकांना टी शर्टचे वाटप करण्यात आले.
कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसी यांनी राबविलेल्या मोफत प्रथमोपचार, आरोग्य तपासणी शिबीराद्वारा, संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांची एक प्रकारे सेवाच केली आहे.महाविद्यालयाने वारकऱ्यांसाठी आयोजित केलेले शिबिर कौतुकास्पद आहे.यापुढे विद्यापीठ आणि कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक चांगले उपक्रम घेतले जावेत असे आवाहन केले.
या आरोग्य शिबीरात डॉ.अभिजित जगताप व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित वारकरी भाविकांचे प्राथमिक आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार केले.
या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,संचालिका कु.स्वरुपराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव,हर्षवर्धन खराडे-पाटील व सर्व संचालक यांनी कौतुक केले.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ.मुकुंद गाडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.बापूराव अंकलगी,प्रा.महेश मिटकल,
प्रा.रविराज जळकोटे,प्रा.प्रशाली शिंदे प्रा.शुभांगी खरात,प्रा.ऐश्वर्या फुटाणे,राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक,महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा