*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ,भूमिगत गटारी रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण ,या मुलभूत सुविधा येवले शहरातील मिलत नगर नांदगाव रोड येथील नागरिकांना केव्हा मिळणार असाच सवाल नागरिक करत आहेत येवले शहरातिल मिल्लतनगर ( नांदगावरोड ) रस्त्यालगत सि. स. नं. 17/1प्लॉट नं. 64, या ठिकाणी सर्व रहिवाशी वर्ग नागरिकांना मूलभूत सोई - सुविधा गरजा 100% पूर्ण केव्हा मिळेल अनेकदा निवेदने देऊन सुद्धा मिल्लतनगर ( नांदगावरोड ) लगत भले मोठे खड्डे पडलेले असून येवला मुख्याधिकारी साहेब याकडे लक्ष देणार.... का...? येवला, अजय राजपूत, डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, याकूब मिस्त्री, अय्युब मिस्त्री, हाजी वसीम शेख, जाहीद असलम शेख, आश्रफ सारंग पेंटर हे सर्व रहिवाशी ( नांदगावरोड ) - ते - मिल्लतनगर, या ठिकाणी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन , भूमिगत गटारी रस्ता काँक्रिटीकरण, हे सर्व गरजा त्वरित उपलब्ध करून द्यावे, तरी या परिसरामध्ये पथ दिवे खांब,लावने करिता, त्वरित मंजुरी द्यावी, रस्त्यावर मध्यभागी मेन लाईन सर्व्हिस तान तार असल्यामुळे ये - जा साठी रस्ताच उपलब्ध राहीलेला नाही तरी, नागरिकांना मोठया संकटानांना सामोरे जावे लागत आहे,
तरी उपविभागीय प्रांत अधिकारी साहेब, येवला व. म. रा. वि. वि. कं. यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी व. मुख्याधिकारी येवला यांनी जलद गतीने त्वरित सर्व्हेक्षण करून या सर्वच कामांना सुरूवात करावी अशी मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, लोकनेते ना.श्री.एकनाथराव शिंदे व. उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनावर स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष,जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, अय्युब अ. गफूर शेख, अजय राजपूत, याकूब अ. गफूर शेख मिस्त्री , रेहान शेरूभाई मोमीन, आश्रफ सारंग पेंटर, हाजी वसीम शेख, जाहीद असलम शेख, ऐकबाल अन्सारी, मोबीन मुलतानी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..सदर याबाबत त्वरित कामांना मंजूरी व चालणा न. मिळाल्यास आम्ही सर्व रहिवाशी नागरिक बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत याची, सर्वच वरिष्ठ प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केलेले आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा